जरांगे यांची नवी खेळी… आता म्हाताऱ्याकोताऱ्यांना उपोषणाला बसवणार; जालन्यातून मोठी अपडेट
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांच्या यांच्या नेतृत्त्वात लाखो लोकं आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत आरक्षणाच्या लढ्यात तरूणांचा मोठा सहभाग होता मात्र आता मनोज जरांगे एक नवी खेळी खेळणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे आता म्हाताऱ्याकोताऱ्यांना या लढ्यात सामिल करणार आहेत.
जालना : मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारनं वेगळ 10 टक्के आरक्षण दिलं. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागला असं सरकार सांगतय. मात्र आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची मागणी ओबीसी आरक्षण देण्याची आहे. मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबद्दल मनोज जरांगे यांना विश्वास नसल्याचं ते म्हणत आहेत. मराठा हा शेतकरी म्हणजेच कुणबी समाज आहे. त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच ते मराठा आंदोलनात आता नवी खेळी खेळणार आहेत.
मनोज जरांगे यांची नवी खेळी काय?
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांच्या यांच्या नेतृत्त्वात लाखो लोकं आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत आरक्षणाच्या लढ्यात तरूणांचा मोठा सहभाग होता मात्र आता मनोज जरांगे एक नवी खेळी खेळणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे आता म्हाताऱ्याकोताऱ्यांना या लढ्यात सामिल करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी वृद्ध लोकांना उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. उपोषणादरम्यान वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल असंही जरांगे म्हणाले. याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत निवडणूका न घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. प्रत्त्येकानं आपआपल्या ठिकाणी आंदेलन करावे असंही जरांगे म्हणाले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही नेत्याला प्रचारासाठी आपल्या गावात येऊ देऊ नका असा आग्रहदेखील त्यांनी केलेला आहे.
24 तारखेपासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या लठ्याला सुरूवात होणार असल्याचे जरांगे म्हणाले. प्रत्येक जिह्यात मराठा समाजानं रास्तारोको करावे असं जरांगेंनी सांगितलं आहे. मराठा समाजाला वेगळ आरक्षण नको तर ते ओबीसीतून द्यावं तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.