शासनाकडे दुसरं काम नव्हतं का?; लक्ष्मण हाके यांचं विधान नेमकं काय?
Laxaman Hake on Maratha And OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एख विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होतेय. कुणबी प्रमाणपत्रावरून लक्ष्मण हाके यांनी नेमकं काय म्हटलंय? सरकारचं नाव घेत हाके काय म्हणाले? वाचा सविस्तर...
कुणबी या नोंदी असतील. तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. कारण मंडल आयोगात कुणबी बाय डिफॉल्ट आहेत. कुणबी दाखले रद्द करता येत नाही. पण मराठा लिहिलं त्या पुढे कु लावायचं. कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे. खानदेश कुणबी गिर्णा नदीच्या काठावर राहतात, खऱ्या कुणबी यांचं राहणीमान वेगळ आहे. मनोज जरांगे यांना मंडल आयोग कधी निर्माण झाला काही माहिती नाही. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगाला बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
जर हिंदू कासार ओबीसीतून आरक्षण घेऊ शकतो. तर मुस्लिम कासार पण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतो. शासनाकडे दुसरं काम होत का नव्हतं?, हे न्यायचे तत्त्व नाही हे मध्येच घुसवण्याचं तत्त्व आहे. ते हाताने कुणबी लिहिताय. वसंतराव नाईक महामंडळाला निधी मिळत नाही, महाज्योती ला निधी मिळत नाही.आरक्षण एकमेव उपाय नाही. ओबीसीतून आमच्या सारखी माणसं जर पुढे आली तर ही शासनाची माणसं आहेत. मॅनेज आहेत, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
उद्या तुम्हाला पंचायतराजमध्ये पण प्रतिनिधित्व मिळणार नाही. ओबीसी बांधवांनो तुम्हाला आम्हाला सोबत यावं लागेल, हे राजकारणी काही करणार नाही. राजकीय पुढाऱ्यांनी भेटायला यावं नाही. यावं हा काहीच विषय नाही. आता आम्ही या महाराष्ट्रात लोकचळवळ उभी करणार आहोत. घटना सांगते समतेच तत्त्व, हे समानतेला पायदळी तुडवतात. शिवाजी महाराज सगळ्यांना मावळा म्हणायचे. त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यांनी कधी जाती भेद केला नाही, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
जरांगेंवर निशाणा
जी गोष्ट आडात नाही, ती पोहर्यात येणार नाही. कोण तरी माणूस उठतो आणि इथली व्यवस्था वेठीस धरतो. मला तुमच्या मुख्यमंत्र्यांचा खेदव्यक्त करावा लागतो. आरक्षण आपलं जीवन चांगलं करण्यासाठी उपाय नाही. सरकार आहे ना त्यासाठी…. या सरकारने ओबीसी समाजाचा बट्ट्या बोळ करून टाकलाय. हे सरकार फक्त एका विशिष्ट जातीसाठी आहे. तुम्ही महाज्योतीला निधी देताना हात आखडता घेता. जरांगे यांनी जनतेच्या दरबारात जावं ना, मुख्यमंत्री आमदार, खासदार कधी तुमचे नव्हते, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.