मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी काल अंतरवलीत जात जरांगेंची भेट घेतली. जरांगेंची तब्येत खालावते आहे, त्यांना जर काही झालं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले. त्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला आता राजे म्हणणार नाही. संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली. तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजी राजे यांना गरिबाचा कळवळा नाही. संभाजी राजे तुम्ही बीडमध्ये आरत्या करत होते का? मराठवाड्यात दुकानावर हल्ले केले गेले. संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटतं. मनोज जरांगेला मराठा समजाचा मक्ता दिलाय का? जरांगे यांनी शाहू महाराजांचा फोटो वापरला का? जरांगे आणि संभाजीराजे जरा औकातीत बोला. मी त्यांना राजा म्हणणार नाही मिस्टर संभाजी भोसले म्हणणार, असं म्हणत लक्ष्मण हाके यांची संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.मिस्टर संभाजी भोसले आपल्याला लाज वाटली पाहिजे. गादीचे माफी मागून सांगतो रयत तुम्हाला राजा मानत नाही. ओबीसी नेते येत नाही. जे नाराज असतील ते असतील. ओबीसी समाज येतोय. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की जो पर्यंत दबावात राहाल. तोपर्यंत जरांगे तुमचा पराभव करेल, असंही हाकेंनी म्हटलं आहे.
चार दिवसांपूर्वी सलाईन घेतलं नंतर उपोषण असतं का? संभाजी भोसले यांनी त्याची जात दाखवली. ओबीसी चा द्वेष दाखवून दिला आहे. ओबीसी समाज त्यांना राजा मानणार नाही.येणाऱ्या काळात ओबीसी सज्ज झाला आहे. राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही.राजा कोणाला ठरवायचं हे आता ओबीसी ठरवेल. संभाजीराजे यांनी भेट द्यायला हवी होती. जरांगेकडे संभाजी भोसले मतांची बेरीज करायला आले, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे बालिश आहे बिनडोक आहे.. सरकार कोणाचं आहे हे सगळं माहिती आहे. आमच्या नेत्याविषयी बोलणं बंद कर… आम्ही शिव्या सुरू केल्या तर अंगावर कपडे राहणार नाही. मागच्या उपोषणाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली होती. ते त्यांच्या पक्षातील मालकांना भिक न घालता उपोषण ठिकाणी येतील, असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केलीय.