राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आज जालन्यात येणार; आंतरवालीतील घटनेच्या चौकशीला वेग येणार?

Maharashtra Additional Director General of Police Sanjay Saxena in Jalna : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आज जालन्यात, लाठीहल्ल्याच्या घटनेचा आढावा घेणार; तर आंतरवालीतील घटनेनंतर कुठे-कुठे बंदी हाक? वाचा सविस्तर...

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आज जालन्यात येणार; आंतरवालीतील घटनेच्या चौकशीला वेग येणार?
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 10:08 AM

जालना | 04 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलाय या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला अन् पेटून उठला. या सगळ्या घटनेचे आज राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आज जालन्यात येणार आहेत. संजय सक्सेना हे जालन्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक स्वतः चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक जालन्यात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस बंद

जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेमुळे गेल्या तीन दिवसांपासून पुण्याहून जालनाकडे बसेस बंद करण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकावरून जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेडकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतायेत. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बस बंदचा फटका बसतो आहे.

सोलापुरातील बार्शीत बंदची हाक

जालन्यातील लाठीचाराच्या घटनेनंतर आज मराठा समाजतर्फे बार्शी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच बार्शी शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. हॉस्पिटल, मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. जालन्यात पोलिसांनी मराठा समाज बांधवावर केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाजतर्फे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आज सकाळपासून बार्शीतील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शहरातील संकेश्वर उद्यान, कसबा पेठ आणि कोर्ट परिसरातील सर्व दुकानं बंद आहेत.

जालन्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात

जालना लाठीचार्ज प्रकरणी आज राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. जालना शहर आणि परिसर माञ सुरळीत सुरू आहे. शहरात जागोजागी अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालना शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. तर गरजेच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. नव्या पोलीस अधीक्षकांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जालना शहर आणि जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.