‘अब्दुल सत्तार म्हणजे औरंगजेब’; सिल्लोड विधानसभेच्या रणभूमीत मोठी धुमश्चक्री, भाजपच्या या बड्या नेत्याने फोडला वादाचा नारळ
Abdul Sattar Sillod Vidhansabha Constituency : अब्दुल सत्तार औरंगजेब आहेत. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा वादाचा नारळ, भाजपच्या या बड्या नेत्याने फोडला. सिल्लोड विधानसभेच्या रणभूमीत आता महायुतीमध्येच सामना रंगल्याचे दिसून येते. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिंदेसेनेला मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदे सेनेचे मोठे शिलेदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महायुतीतीलच घटक पक्षातील नेत्याने आसूड ओढला आहे. अब्दुल सत्तार औरंगजेब आहेत. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा वादाचा नारळ, भाजपच्या या बड्या नेत्याने फोडला. सिल्लोड विधानसभेच्या (Sillod Vidhansabha Election 2024) रणभूमीत आता महायुतीमध्येच सामना रंगल्याचे दिसून येते. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिंदेसेनेला मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा नवीन वाद नाही, त्याला जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवाची झालर आहे. त्याचे पडसाद आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दिसतील, असा दावा करण्यात येत आहे.
रावसाहेब दानवे यांनी टाकला बॉम्ब
अब्दुल सत्तार औरंगजेब आहे. औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाही. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा इशारा पण त्यांनी दिला. मला राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर सुद्धा जायचं नाही मी पक्षाचे काम करणार आहे. आमच्याकडे लवंगी फटाके नाही तर बॉम्ब आहेत. ते येणाऱ्या काळात फुटणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोड च्या जनतेवर छाप टाकण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांना ते आता जमणार नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे.
सत्तारांची भाषा अंहकाराची
अब्दुल सत्तार यांची भाषा अंहकाराची आहे. त्यांनी भाषा सुधारली पाहिजे असा टोला भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे लगावला. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. तुम्ही काय औरंगजेब समजून स्वारीवर निघालात का? असा खडा सवाल त्यांनी केला. सत्तारांना सिल्लोडमधील सर्व सत्तास्थानं काबीज करायची असल्याचा आरोप त्यांनी केला. इतरांना गाडून ते हे काम करायला निघाल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाने जर सांगितले तर आपण सत्तारांचा प्रचार करण्यास जाणार असल्याचे ते म्हणाले. सत्तार आणि दानवे यांच्यातील कलगीतुरा मतदारसंघातील जनतेला नवीन नाही. पण यंदा दानवे यांच्या पराभवाने सत्तार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येते.
उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार
गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. मागच्या अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असा कोणता बोर्ड लावला की मी हे केलं ते केलं. उद्धव ठाकरे यांनी फक्त सत्तेसाठी राजकारण केलं आणि नको त्या लोकांशी युती केली. सत्तेसाठी सर्व काही करणे हाच उद्धव ठाकरे यांचा उद्देश आहे.