मोठी बातमी : ‘…यांनाच मतदान करा, बाकीचे पाडून टाका आता मराठे मोकळे’; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमधील मराठा समाजाला आवाहन केलं आहे. कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं आणि कोणाचा करेक्ट करायचा हे मनोज जरांगे यांनी सांगितलं. नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

मोठी बातमी : '...यांनाच मतदान करा, बाकीचे पाडून टाका आता मराठे मोकळे'; मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 6:21 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. प्रत्येक गावामधून मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून कोणाला मतदान करायचं हे सांगत कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे सांगितलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मराठा समाजाला जिथे वाटेल की हा उमेदवार मराठा आणि कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्या ज्या काही चार ते पाच मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार त्यालाच मराठ्यांनी मतदान करा. कार्यक्रम मात्र शंभरटक्के लावायचा कधीच न पडणारा पाडायचा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. लोकांना आधी उमेदवार द्यावा लागतो मात्र आपलं उलटं आहे, आपल्याकडे आधी मत आहेत. मराठा आता हारून देऊ चालणार नाही. या राजकारणाच्या नावाखाली माझी जात राहता कामा नये. तिला मी मातीत मिसळू शकत नाहीत. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचाय. कोणालामही पाठिंबा नाही, लोकसभेमध्ये ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं जरांगे यांनी सांगितलं.

जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेचा आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा कशा उमेदवारी देतात, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होते. शिक्का असा हनायचा, ते म्हणाले पाहिजे मराठ्यांच्या नादी लागायचे नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी कोणालाही मतदान करणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

आता मराठे मोकळे राहिले, ते आता टेन्शमध्ये आले असतील. नेमका कोणत्या उमेदवाराला मराठे पाडणार त्यांना समजणार नाही. राजकारणामुळे मला जातीचं वाटोळं करायचं नसल्याचं जरांगेंनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.