Video : एक मराठा लाख मराठा! मनोज जरांगे यांची मध्यरात्री उपोषणाला सुरूवात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मंगळवारी रात्री मध्यरात्रीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत सरकारला आता ही शेवटची संधी असल्याचं म्हटलं होतं. मनोज जरांगेंचे हे सहावे उपोषण असून आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे.

Video : एक मराठा लाख मराठा! मनोज जरांगे यांची मध्यरात्री उपोषणाला सुरूवात
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 12:49 AM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवला सराटी येथेउपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारला आता शेवटची संधी आहे. सरकार आम्हाला जाणूनबुजून आरक्षण देत नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता सुरूवात झाली आहे.

मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गॅझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे, अशीस मागणी केली होती.

मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडे आहेत त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, असं म्हणत जरागेंनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला होता.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.