धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?; मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं

Manoj Jarange and Dhananjay Munde Meeting : अंतरवली सराटी गावात जात मंत्री धनंजय मुंडे यांनी मनो जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली? जरांगेंनी सांगितलंय. मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत काय म्हटलं? परळीतील घोंगडी बैठकीचे अपडेट्स, वाचा सविस्तर...

धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?; मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं
धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 12:09 PM

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री अंतरवली सराटी गावात जाऊन मुंडेंनी जरांगेंची भेट घेतली आहे. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ चर्चा झाली. या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? याबाबत मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा झाली. ती काही विशेष नव्हती. त्यात शेतकऱ्यांचा मुद्दा होता. ज्यावेळेस आमची आरक्षणबाबत चर्चा झाली त्यावेळेस ही व्यासपीठावर धनंजय मुंडे होते. मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मी लढत राहणार आहे. ते आरक्षण फक्त ओबीसीतून मिळावं, यासाठी कायम ठाम असणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंशी काय चर्चा?

आमची आरक्षणावर चर्चा झालीच. मला आरक्षणाशिवाय दुसरं काही नाही. समोरचाच वेगळंच असतं आणि माझं वेगळंच असतं. मी झोपेत होतो आणि ते आले तीन वाजले असतील अंदाजे. 20 एक मिनिट चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. यावेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमची चर्चा झाली, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे आरक्षणाबाबत काय म्हणाले?

इथे कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथे मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते. मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा आहे. शंभुराज देसाई यांनी कुणबींना सहा महिने व्हॅलेडीटीची वाढ दिली आहे. बैठक परळीत आहे आणि ती ताकतीने होणार आहे. मी जातीवादी नाही. तसं कृषिमंत्र्यांनी चांगलं काम करायला लागली शेतकऱ्यांचं, तर कौतुक का करू नये, असं जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांची परळीत घोंगडी बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जरांगे पाटील परळीत दाखल झालेत. दुपारी दोन वाजता परळीत ‘हलगे गार्डन’ या ठिकाणी घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

निवडणुकीसाठी आम्ही तयार- जरांगे

विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही. त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार आहोत. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असं एक मोठा आमदार बोलू लागलेला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाहीत. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलू शकत नाही. आंदोलनात किती येतील याची संख्या कधीच मोजायची नसते. गाव स्तरावर खालच्या स्तरावर मी कधी जातीवाद करत नाही. मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे तू पक्षाच्या बाजूने बोलत नाही, असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.