Manoj Jarange : आता चकव्याला दाखवतो कचका; भाजपच्या या बड्या नेत्याला मनोज जरांगे यांचा थेट इशारा, विधानसभा निवडणुकीअगोदर वाढवले टेन्शन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपच्या या बड्या नेत्याला थेट इशारा दिला आहे. आता चकव्याला कचका दाखवतो असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीअगोदरच या मतदारसंघात टेन्शन वाढले आहे.

Manoj Jarange : आता चकव्याला दाखवतो कचका; भाजपच्या या बड्या नेत्याला मनोज जरांगे यांचा थेट इशारा, विधानसभा निवडणुकीअगोदर वाढवले टेन्शन
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 4:03 PM

मराठा आरक्षणाला एक वर्ष पूर्ण झाले. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला. फडणवीस यांनी मराठा समाजाला वेढीस धरल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी मराठवाड्यातील या बड्या भाजप नेत्याला सुद्धा त्यांनी थेट इशारा दिला. आता चकव्याला कचका दाखवतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात चिंता वाढली आहे.

रावसाहेब दानवे यांच्यावर नाराजी

रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली. मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो. मी नेहमी त्यांचा आदर करतो. त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आता केली आहे. काय करशील. तुमचं कोणी तरी उभं राहील ना कोणी तरी. मग दाखवतो कचका. कर कुणालाही उभं, असं इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

नाही तर नागपूरची सीट पडेल

रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी दानवे यांनी विषय लांबवू नये. रावसाहेब दानवे यांनी महिलावर केस केली. माझ्या नादी लागशील तर नागपूरची सीट पण पडत असते मला जेल मध्ये टाकले तर पोर हनुमान सारखे जेल उचलून आणतील नाही. तर मी भोकरदन मध्ये ऑफिस उघडतो, असा इशारा त्यांनी दिला. या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे निवडून आले आहेत. तुम्हाला देशोधडीला लावतो. रावसाहेब दानवे यांनी माझ्या नादाला लागु नये रावसाहेब दानवे चकवा, माझ्यावर केस करायला लावली, आता तुझे कोणी उभे राहिले न दाखवतो कचका आता, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे भोकरदन मतदारसंघात टेन्शन वाढलं आहे.

फडणवीस-महाजनांवर गंभीर आरोप

धनगर समाजाने मोठा उठाव केला, पण पंचक मोचक ( गिरीश महाजन ) धनगर आंदोलन मोडीत काढले एसटी आरक्षण आंदोलन मोडले मराठा आरक्षण मोडीत काढले. देवेंद्र फडणवीस हा बधिर डोक्याचा आणि क्रूर गृहमंत्री फडवणीस यांनी जातीय वादी पोलिसांकडून लाठीचार्ज करायला लावला. मी देवेन्द्र फडवणीस याला झोपवल्या शिवाय सोडणार नाही, मी बदला घेणार. माझ्यावर एसआयटी नेमण्यात आली, माझ्या खिशात आठ आणे नाहीत माझ्या खिशात कोणी हात घालत नाही, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....