मुख्यमंत्री शिंदेंनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, अन्यथा…; मनोज जरांगेंचा इशारा काय?

Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री शिंदेंनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, अन्यथा...; मनोज जरांगेंचा इशारा काय?
एकनाथ शिंदे, मनोज जरांगेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 1:22 PM

एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तो सगळा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज होणार आहे. शिंदेंना मराठा समाज मानतो. पण आता एकनाथ शिंदे पूर्णपणे मराठा समाजाच्या मनातून उतरणार आहेत. दोन- तीन लोक लोक मुख्यमंत्रीसाहेबांचे कान फुकत आहेत. त्यानंतर मराठा समाजाचा गेम, दगाफटका मुख्यमंत्री शिंदेंनी करू नये. शंभुराज देसाईंना सांगतो की मुख्यमंत्र्यांना समजून सांगा… याचं त्याचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा गेम केला तर ते मराठा समाजाच्या मनातून उतरतील, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जालन्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीसांवर निशाणा

भाजप पुरस्कृत बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे मनोज जरांगेंवर वारंवार टीका करताना दिसतात. याला जरांगेंनी त्यांची नक्कल करत उत्तर दिलंय. राजेंद्र राऊतांचे हातवारे करत जरांगेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरसारखी परिस्थिती फडणवीस यांना राज्यात घडवून आणायची आहे, असं मोठं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.

मला सुद्धा हे 3 महिन्यापासून माहीत आहे. 8 हजार पुरावे सापडलेले आहे, हे काही नवीन नाही.या काल परवाच्या हालचाली नाही.सगे सोयरे अंमलबजावणी करा… सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. आता ज्या हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू आहे हे गोरं गरिबांचं यश आहे. शंभूराज देसाई हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासाठी 3 महिण्यापासून प्रयत्न करतायत पण आम्ही इथेच थांबणार नाही.आम्हाला सातारा आणि बॉंबे गॅझेट लागू हवं आहे. सगे सोयरे अंमलबजावणी आम्हाला हवं आहे. याच श्रेय कुणीही घेऊ नये, असं मनोज जरांगे म्हणाले.

पुन्हा आमरण उपोषण करणार- जरांगे

प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ज्याने त्याने बिनधास्त करू नये. छगन भुजबळ- देवेंद्र फडणवीस दंगल करायला लावतील. त्यांचं ऐकू नका. 16 सप्टेंबरला रात्री  12 वाजेपासून अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे. सर्व गॅझेट मध्ये सरकारी नोंदी आहे.कुणीही गॅझेट लागू करण्याला विरोध करू नये. श्रेयासाठी माकडांनी इकडे तिकडे पळू नये तुम्हांला आयुष्यात काहीही करता आलं नाही. मराठा नेत्यांनी सोयीनुसार बोलू नये स्वतःला हुशार समजू नये. मराठ्यांनी रक्त सांडलेले आहे. त्यामुळेच गॅझेट लागू होईल. इतर कुणामुळे ते लागू होणार अस नाही. गॅझेट लागू होण्याचं श्रेय फक्त गरीबांच असेल. माझ्या आंदोलनाचं हे यश नाही, हा गरिबांनी उभा केलेल्या लढ्याचा परिणाम आहे, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.