कदाचित हे माझं शेवटचं उपोषण असेल…; मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी सरकारला इशारा दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावही जरांगेंनी यावेळी घेतलं आहे. मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

कदाचित हे माझं शेवटचं उपोषण असेल...; मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 8:31 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी खूप चांगलं मानतो. पण 100% सरकारने मला खेळवले. विमानतळावर सीसीटीव्ही अमुक सर्व आहे. कोण गेलं कोण उतरला कळतं. मुख्यमंत्र्याला बदनाम करण्याचं ओएसडीचं काम आहे. वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल. असंच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.

ओएसडी कोण? असा प्रश्न पत्रकारांनी जरांगेंना विचारला. त्यावर समाजालाही माहिती आहे. 15 लाख वाटायला कोणता ओएसडी निघाला होता… हमेशा हमेशा मध्ये मध्ये बुळबुळ कोण करतो. थांबा नावच घेईल पुढचे… षडयंत्र काय करतो ते पाहू. त्यांनी ते षड्यंत्र नाही थांबवलं तर धडाधड नाव घेऊ… तीन नाव आमच्याकडे आली आहेत. प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं मंत्रिमंडळाचे लोक येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय समाधानी कोणावर विश्वास ठेवायचा? असं मनोज जरांगेंनी म्हटलं.

…तर डोक्यावर घेऊन नाचू- जरांगे

मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे. ते कोणीही द्या… आमचा एकनाथ शिंदे साहेबांवरती सरकारवरती आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत. आमचे हे मी मागे सांगितलं आहे की ते कार्य करतात. ते आपल्याला जमत नाही. जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही. त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का? आमचा सगळ्यांवरतीच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या कोणीही द्या मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

“शिंदे अन् फडणवीसांना सांगतो की…”

मी एकनाथ शिंदेसाहेबांना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की, मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही. काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का? किती दिवसात करणार आहात? केसेस लगेच मागे करणार की किती दिवसात करणार? हे मला डिटेल्स पाहिजेत, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.