मला बदनाम करू शकतात, पण मला मॅनेज…; मनोज जरांगेंचं विधान चर्चेत
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसंच मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. काय म्हणाले? वाचा सविस्तर...
उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना संबोधित केलं. हे करून मला बदनाम करू शकतात. मला हे मॅनेज करू शकत नाही. त्यांचे फोन येतात. पण मी म्हणतो. आरक्षण घेऊन येत असाल तर या…. नाही तर मी घोडे लावत असतो. इथे पडून राहू शकत नाही. पुन्हा अंतरवाली आलो की भेटू. मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊ नका. तुम्हाला संधी आहे फडणवीस साहेब… मराठा आणि कुणबी एकच आहेत. फडणवीस यांनी मंत्री यांना काम करू द्यावे. आचारसंहिता संपेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून जाऊ नका. हात जोडून सांगतो लेकरांचे वाटोळे होऊ देऊ नका, असं जरांगे म्हणाले.
जरांगेंचं उपोषण स्थगित
राज्यभरातून मराठा समाज अंतरवालीकडे येत आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील 4 वाजता उपोषण सोडणार आहेत. त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे पाटील गावातील महिला आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हाताने 4 वाजता उपोषण सोडणार आहेत.
पावसात लोक अंतरवलीत येत आहेत वाईट वाटत आहे. काल प्रचंड त्रास होत होता. पाच सात सलाईन लावले. रास्ता नाही आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. चिखलाचा रस्ता आहे. आपण कुणाला दाखवण्यासाठी नाही तर देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचे आंदोलन आहे. 83 क्रमांकावर मराठा कुणबी आहेत, सरसगट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या. राजकारण्याला आणि त्यांच्या मुलाला मोठे करू नका. पक्ष, सत्ताधाऱ्यांनी धोका दिला तरी, मराठा समाजाने आपल्या जातीशी आणि लेकराशी धोका करू नका. तुमच्या हाताने तुमची सत्ता पाडू नका. कालचा दिवस माझ्यासाठी वाईट होता, महिला मी उपचार घ्यावे म्हणून ओरडत होत्या, असे वाटत होते. पुन्हा उपोषण करू नये, असं जरांगे यावेळी म्हणाले.
जातीवादावर जरांगे काय म्हणाले?
मी जातीयवादी मग माधव पॅटर्न आणला तो जातीयवाद नव्हता का? तू आंदोलन संपू दे तुझा जातीयवाद संपवतो. जातीयवाद वाढू नये जेवढी जबाबदारी मराठ्यांची आहे, तेवढीच ती त्यांची आहे. आपल्या आंदोलन मुळे नोंदी सापडल्या, मुलींना मोफत शिक्षण मिळाले. फडणवीस यांना वाटत असेल खड्डे भरून निघेल, भरून निघणार नाही. विदर्भ मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रमधील मराठे एक आहेत. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही. कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले तसे करायचे, असं जरांगे म्हणाले.