मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. अशातच काही दिवसांआधी मी एकटा पडलो आहे, असं मनोज जरांगे यांनी विधान केलं होतं. त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या. आता यावर स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का…? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत म्हणून मी एकटा पडलो आहे असे म्हणालो, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय.
आता मी थेट अंतरवाली जाणार आहे. देवाचे दर्शन घेणार आहे. सर्व राज्य म्हणत आहे की हे मराठ्यांचं राज्य आहे. तर मग मराठा समाजावर अन्याय का? मी धनगर बांधवांना आणि यांच्या नेत्याला विरोधक मानत नाही. पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभराजे देसाई म्हणाले आहेत 13 जुलै पर्यंत थांबा…, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
डॉ. तारख यांना काळे फासले. मला वाईट वाटले. आंदोलनाला गाल बोट लावण्याचे काम चांगले नाही. डॉक्टरकडून एक चूक झाली असेल ते आम्ही सोडून दिले आहे. शेवटी समाजाचे आंदोलन आहे. डॉ. तारख यांना माहीत आज मी असे काही करत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडवणीस यांनी दखल घेतली असेल. म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला असेल. येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढू तर दंगल होण्याची भीती वाटत असेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
मला किंवा समाजाला वेड्यात काढू नका. नाही तर मराठा समाज म्हणेल आम्हाला फसवले. तुम्ही 70 वर्षांपासून फसवे सरकार आहेत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही दिलेली सग्या सोयऱ्याची व्याख्या पाहिजे. आम्हाला हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट आणि 33/34 च्या नोंदी लागू केल्या. तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं मनोज जरांगे म्हणाले.