आंदोलनात शक्य- अशक्य नसतं, आरक्षण मिळालं नाहीतर…; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळाआधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका मांडली. ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आंदोलनात शक्य- अशक्य नसतं, आरक्षण मिळालं नाहीतर...; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 2:03 PM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपोषणाचं हत्यार त्यांनी उपसलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. माझा ध्येय आरक्षण मिळवणं आहे. माझ्या जातीने थोडा कचका दाखवलं आहे. नंतर बसणं- फिरणं कठीण होईल. आपल्याला हलक्या घेतलं तर सरकारलाही कळेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. फडणवीस बळ देत असतील, आम्हाला आरक्षण मिळत असेल तर चांगलं. आहे. फडणवीस आमचे दुश्मन नाहीत. आमच्यावर बोललं तर सोडलं नाही. सरकार वेळ दिलाय. शक्य -अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसतात. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर लढायला समाज तयार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

ओबीसी समाजानेही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाकडून आम्हाला पत्र हवा आहे की, मराठा समाजाला ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही आणि कसा लागणार नाही, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना आमचा विरोध नाही. त्यांच्यावर उत्तर द्यायचं? एकही ओबीसी नेत्याला बोललो नाही. बबनराव तायवाडे आणि इतर लोकांना काही बोललो नाही. ते विरोधक नाही. ज्यांना मानलं त्यांना मानलं आहे. तो विरोधक आहे.काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे.दुसऱ्यांचे मुल डोळ्यासमोर ठेवला पाहजे. मराठ्याचं मुलं मोठं झाले पाहजे हे छातीवर हात ठेऊन विचार केला पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

मनोज जरांगेंचा इशारा

मुख्यमंत्री एका जातीचे नाही. मुख्यमंत्र्याला जातीत तोलयाच नसतं. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं त्यांचं प्रश्न मी प्रवक्ते नाही. एक वर्ष झाला आता काय मिळवलं काय गमावलं हे सांगेल. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.

प्रकाश शेंडगे यांच्या भूमिकेवरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. लोकशाहीत कोण कुणाला लढू नका म्हणत. आम्ही एकडून तुम्ही तिकडून तो. मात्र एवढ्या मोठ्या माणसाने बोलू नये. धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळवण्यासाठी केली असती, तर बरं झालं असतं. आम्हाला विरोध करायचं काम केल्या पेक्षा धनगर समाजासाठी केलं असतं तर त्या समाजाचं कल्याण झालं असतं. आपण आपला राजकीय विचार समोर ठेवण्यापेक्षा धनगर समाजासाठी विचार करा, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.