केवळ ‘ही’ धाडसी व्यक्तीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते; मनोज जरांगेंना विश्वास

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता एक मोठं विधान केलं आहे. एकच व्यक्ती मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. त्यांचं विधान काय? वाचा सविस्तर...

केवळ 'ही' धाडसी व्यक्तीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते; मनोज जरांगेंना विश्वास
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 12:46 PM

मी पुन्हा पुन्हा सांगतो की, एकनाथ शिंदेसाहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. तो माणूस धाडसी आहे. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. पण एक वर्ष आम्हाला वाट बघायला लावली एवढा आमचा अंत पाहिला नाही पाहिजे. EWS मधले पोरं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्यावर शिंदे साहेबांनी लक्ष दिले पाहिजे. सग्या – सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तीनही गॅजेट लागू झाली पाहिजे. केसेस वाफस घेतो म्हटले होते त्यावर काही झालं नाही व्हॅलिडीटी होत नाही यावर शिंदे साहेबांना लक्ष दिले पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवली सराटीत बोलताना त्यांनी हे विधान केलंय.

उपोषणाबाबत काय म्हणाले?

मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी उपोषण करत आहे. समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजे यासाठी मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून उपोषणाला बसतोय. 17 सप्टेंबरपासून आपण आमरण उपोषण पुकारलं आहे. कोणी काम सोडून अंतरवाली कडे येऊ नका. 16 तारखेला रात्री बारा एक वाजल्यापासून मी बसणार आहे, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

पुन्हा फडणवीसांवर निशाणा

मराठा समाजाला माहित आहे की मस्ती आणि माज कोणाला आलाय. देवेंद्र फडणीस यांना आलाय की मला आलाय…. तुम्ही आरक्षण द्या विषय संपला, माज कसा असतो, काय असतो तुम्ही आरक्षण तर देऊ नका, कचका मराठ्याचा कसा असतो ते. काही आमदार, काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वयक फोडा फोडीचं काम सुरू आहे. तुम्हाला का वाटत नाही गरीब मराठ्यांची पोर मोठी व्हावी तुम्ही महाविकास आघाडीवर का ढकलता. तुम्ही आरक्षण द्या हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील तुम्ही आरक्षण द्या तुम्हालाही फायदा होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणले महाविकास आघाडीला फायदा झाला त्यांच्याकडून लिहून घ्या. ओबीसीतून आरक्षण देणार का गरज नाही. लिहून घ्यायची तुम्ही द्या तुमचा फायदा होईल. थोडं थांब, थोडं थांब सगळं होतं. टायमाला तोफ धडाडती की फुसका बार होतो.मराठ्याच्या विरोधात गेला पक्ष सुद्धा आणि नेते सुद्धा संपले आहेत परिस्थितीतील फक्त आरक्षण देऊ नका. आचार संहिता लागायच्या आधी तुम्ही आरक्षण देऊ नका ही जनता, शेतकरी आणि मराठे तुमच्या हिशोब चुकता करणार आहे, असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.