पंकजा मुंडेंचं काल मी कौतुक केलं पण, त्यांच्या मनात…; मनोज जरांगेच्या विधानाने भुवया उंचावल्या
Manoj Jarange Patil on Pankaja Munde Vidhanparishad Candidacy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी....
पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. याचाच दाखला देत मनोज जरांगे पाटील यांनी आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मी कालच त्यांचे कौतुक केले. पण त्यांच्या मनात जो मराठा द्वेष भरलेला आहे. तो द्वेष सोडून एक लहान भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून प्रेमाचे संबंध तयार केले पाहिजे. ते तसेच राहिले तर त्यांना आमचा कधी विरोध नव्हता आणि पुढे असण्याचे काही कारण नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
उलट्या खोपडीचे उलट सुलट बोलणार हे मला माहीत होते आणि ते झालेच, काल आम्ही त्यांचे कौतुक केले पण त्यांनी मान्य केले का? आम्ही त्यांचे कौतुक केले मोठे मन दाखवले. आम्ही त्यांना आणि राज्यात कोणालाही पाडा म्हणालो नाही, तरीही आम्हाला दोष देण्यात आला. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली मग आम्ही नाराज असण्याचा प्रश्न नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.
पुरोगामी विचाराला धरून आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर ते उलटे समजतात आणि मग मी आहे. स्वाभिमानी आणि मला सहन होत नाही. आम्ही कमजोर नाही. मी काल कौतुक केले तर काही जण बोलले आणि ते आपल्याला सहन होत नाही. आम्ही कुणावर अन्याय करण्यासाठी जन्म घेतलेला नाही आणि ते आमचे धंदे पण नाहीत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनात आणि विचारात परिवर्तन करावे अरे मग त्यांचे शंभर टक्के कौतुकच आहे. तुमचे अस्तित्व राहिले पाहिजे आमचे. तो राहिले पाहिजे. ही मराठ्यांची भावना आहे. तसे असते तर तुम्हाला इतके वर्ष निवडून दिले नसते, असं म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विजय वडेट्टीवार यांची विधान सभेत मागणी
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळ्याची ही कुठली पद्धत आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचं वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.