उद्या सगळ्यांनी अंतरवलीत या, आपण…; इच्छुक उमेदवारांना मनोज जरांगेंची महत्त्वाची सूचना
Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार आहेत. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुत असणाऱ्यांना मनोज जरांगेंनी चर्चेसाठी बोलावलं आहे. मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...
मी मुलाखती घेणार नाही. जे इच्छुक आहेत ते प्रचंड आहेत. न्याय द्यायचा असेल तर एक द्यावा लागणार आहे, हे समाजाला माहित आहे.अनेक जण इच्छुक आहेत म्हणून मीच त्यांना इकडे बोलून घेत आहे. 23 जिल्ह्याचे आपण बोलावलं होतं. मात्र रात्रीपासून फोन सुरू झाले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की एका टप्प्यात सगळं करू. राहिलेले जिल्हे हॅलो एक-दोन दिवसात घ्यायचे होते. मात्र उद्याच सगळे या… सकाळी 8 वाजल्यापासून आपण सुरू करू. रात्रीचे 12 वाजो की 4 वाजो सगळ्यांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातील सगळे इच्छुक या कार्यकर्त्यांना सोबत आणू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
राज्यात होत असलेल्या विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांनी उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण कुणी अर्ज मागे घ्यायचा ते ठरवू, असं मनोज जरांगेंनी याआधीच जाहीर केलंय. त्यानंतर आता इच्छुक उमेदवारांना मनोज जरांगेंनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
इच्छुक उमेदवारांना मनोज जरांगेंच्या सूचना काय?
कुणीपण फॉर्म भरू नका. कारण बाकीचे लोक आपल्याला नाव ठेवतील. मी उद्या मतदारसंघ सांगणार नाही. आपण एक – एक उमेदवार तयार करत आहोत ज्या मतदारसंघात आपण लढवायचं ठरवलं आहे. त्याच मतदारसंघात लढवायचं बाकीच्यांनी फॉर्म काढून घ्यायचे. उद्या राहिलेले सगळे जिल्हे येऊन जा. दोन-चार गावाला सांगून ठेवले जेवणाची व्यवस्था करून ठेवा. पूर्ण तोडगा काढण्याचा उद्या प्रयत्न करणार आहे, असं जरांगे म्हणालेत.
गनिमी कावा अन् साधनता; जरांगेंचा उमेदवारांना कानमंत्र
आम्ही फक्त उद्या एक उमेदवार देण्याची प्रक्रिया पूर्ण करतोय. त्यांच्या पूर्ण याद्या कळाल्याशिवाय मतदारसंघ आणि उमेदवार सांगणार नाही. त्यांचे कोण आहेत ते आम्हाला आधी बघायचे. कारण त्यांनी आमच्यावर डाव टाकला होता. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर डाव टाकावा लागणार आहे. त्यांचे उमेदवार कोण आहेत हे बघ ना आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला उमेदवार आणि मतदारसंघ आताच कळू द्यायचा नाही सावधगिरी गनिमी काव्याने डाव ठरवायचा आहे, असंही जरांगे म्हणालेत.