Manoj Jarange Patil | माझ्यासोबत घातपाताचा प्रकार! मनोज जरांगे पाटील यांनी केला गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी उपोषण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण आज त्यांनी केलेले काही गौप्यस्फोट सर्वांची चिंता वाढवणारा आहे.

Manoj Jarange Patil | माझ्यासोबत घातपाताचा प्रकार! मनोज जरांगे पाटील यांनी केला गौप्यस्फोट
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 11:21 AM

अंतरवाली सराटी, जालना | 10 February 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. पण त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. आपल्यावर राज्यात अनेक ठिकाणी हल्ला झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. राज्यात सामाजिक कार्य करणाऱ्यांना सुरक्षा नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे? असा खोचक सवाल करत, त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याचा टोला त्यांनी हाणला.

कायद्यासाठी आमरण उपोषण

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांनी उपोषणाला बसण्याअगोदर माध्यमांशी संवाद साधला. अंतरवाली सराटीतूनच त्यांनी गेल्यावर्षी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली होती. राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निग्रह जरांगे पाटील यांनी घेतला.

हे सुद्धा वाचा

आपल्यावर झाला हल्ला

माध्यमांशी बोलताना त्यांनी, ” माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न पण करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेतले होते. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीला माहिती दिली आहे. अमरावतीमध्ये ही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.”

वयस्कर माणसाला कोण मारणार?

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या, ईमेल, मॅसेज येत आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. वयस्कर माणसाला कोण मारणार,मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे? असा खोचक सवाल करत, त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. तर आपण त्यांच्यासारखा बनाव करत नसल्याचा टोला त्यांनी हाणला. जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी त्यांनी राज्य सरकारने देऊ केलेली सुरक्षा नाकारली होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.