मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस; मराठा समाजाकडून बंदची हाक

Manoj Jarange Patil Uposhan : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. आज परभणी, जालना, बीड आणि पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. कुठे बंद पाळण्यात येतोय. काय आहे या जिल्ह्यांमधील स्थिती काय आहे? वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस; मराठा समाजाकडून बंदची हाक
मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलकImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 10:17 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरु आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी जरांगेंचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशात राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज कडून आज परभणी बंदची हाक दिली गेली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थनात जालना बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय परभणी आणि पुण्यातही बंद पाळला जात आहे.

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बंदची हाक

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज अखंड मराठा समाजाकडून जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. काल वडीगोद्री फाटा इथं मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झालेला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर वडीगोद्रीत सुरू असलेल्या ओबीसी आंदोलन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वडीगोद्री येथून अंतरवली सराटी गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज कडून परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवली आहे. बीड जालना पाठोपाठ आज परभणीत बंद असणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाने बंद पुकारला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात मराठा समाजाकडून बंद पाळण्यात येणार आहे. तर पुणे शहरात मात्र हा बंद पाळला जाणार नाही. पुणे शहरात सर्व व्यवहार सुरळितपणे सुरू असणार आहेत.

ओबासी समाजाचं आंदोलन

ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. सकाळी जालन्याचा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी केली दोघांचाही बीपी सध्या तरी स्टेबल आहे. मात्र दोघांनीही आता उपचार घेण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आरोग्य प्रशासनाकडून तशी उपचार घेण्यासाठी विनवणी देखील करण्यात आली आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.