Manoj Jarange Patil Flim | मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून येणार, चित्रपटाचे निर्माते म्हणतात,…
जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट काढणार आहोत. ११ दिवसांचा संघर्ष लोकांना माहीत आहे. पण, त्या पाठीमागे जरांगे पाटील यांचा मोठा संघर्ष आहे. यामागचा संघर्ष अतिशय भयानक आहे. तो संघर्ष महाराष्ट्राला माहीत व्हावा. देशाला त्यांचा संघर्ष कळणं गरजेचं आहे.
संजय सरोदे, जालना, ८ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ११ दिवसांपासून उपोणण करत आहेत. जरांगे पाटील यांनी आतापर्यंत बराच संघर्ष केला. त्यांचा संघर्ष चित्रपटात रुपांतरित होणार आहे. त्यासाठी आज चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. लेखक, निर्माता गोवर्धन दोलतळे म्हणाले, जरांगे पाटील यांनी गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आलो आहोत. जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट काढणार आहोत. ११ दिवसांचा संघर्ष लोकांना माहीत आहे. पण, त्या पाठीमागे जरांगे पाटील यांचा मोठा संघर्ष आहे. यामागचा संघर्ष अतिशय भयानक आहे. तो संघर्ष महाराष्ट्राला माहीत व्हावा. देशाला त्यांचा संघर्ष कळणं गरजेचं आहे.
हरणार नाहीतर मरणार अशी लढाई
मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षामुळे यश मिळताना दिसत आहे. हरणार नाहीतर मरणार अशी लढाई यांनी लढली आहे. तयारीनिशी ते रणांगणात उरतले आहेत. जरांगे पाटील यांचे वास्तव काय, हे चित्रपटाच्या माध्यमातून सांगणार आहोत. संघर्षयोद्धा असं या चित्रपटाला नाव दिलंय. उद्याच्या येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं. इतिहासात त्यांची नोंद झाली पाहिजे. जरांगे पाटील यांचे विचार या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवले जाणार आहेत. राज्यातील जनता सपोर्ट करतील. जरांगे पाटील यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
कलाकार रोहण पाटील म्हणतात, १५ किलो वजन कमी करणार
रोहण पाटील हे जरांगे पाटील यांची भूमिका करणार आहेत. पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांचे उपोषण हे राज्यभर पोहचले आहे. फक्त ११ दिवसांचा संघर्ष नव्हे तर त्यांच्या जीवनातील संघर्ष हा राज्यातील जनतेच्या भेटीला आला पाहिजे. हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. या भूमिकेसाठी १५ किलो वजन कमी करणार आहे. थरारक अशी भूमिका करणार आहे. तळमळीचा कार्यकर्ता मी साकारणार असल्याचं रोहण पाटील यांनी म्हंटलं.
दिग्दर्शक म्हणाले, या चित्रपटाचे नाव संघर्षयोद्धा आहे. वास्तविकता दाखवायचं आहे. समाजासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं आहे. आतापर्यंत ते समाजासाठी जगत आले आहेत. ते चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणार आहोत.