सर्वात मोठी बातमी | मनोज जरांगे यांना पहिल्यांदाच ‘हा’ त्रास, प्रकृती खालावली, डॉक्टर म्हणाले…

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अचानक जरांगे यांच्या छातीमध्ये दुखू लागलं असून उपचार केलेल्या डॉक्टरांनी हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांचा जीव भांड्यात पडला आहे.

सर्वात मोठी बातमी | मनोज जरांगे यांना पहिल्यांदाच 'हा' त्रास, प्रकृती खालावली, डॉक्टर म्हणाले...
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 10:49 PM

जालना | 1 मार्च 2024 : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. असं असताना त्यांची आज अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या अचानक छातीत दुखू लागलं आहे. यापूर्वी त्यांच्या छातीत कधीही दुखत नव्हतं. मनोज जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

अचानक छातीत दुखणे हे गंभीर आहे. मी सध्या इंजेक्शन आणि सलाईन लावले आहे. मात्र उपचाराला त्यांची साथ नाही. इथे केवळ प्राथमिक उपचार होतील. त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याची गरज आहे. त्यांचे सध्या पल्स चांगले आहेत. मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपचार करणाऱ्या डॉ. विष्णू सकुंडे यांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी गावात गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु होतं. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आल्यानंतरही ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईलादेखील निघाले होते. पण दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा जालन्याच्या अंतरवली सराटी गावात आले.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली होती. पण तरीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच राहील असं त्यांनी जाहीर केलं होतं. आपण उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळी उपचार केले जात होते. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात होती. पण त्यांना आज अचानक छातीत दुखू लागल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती समोर आल्यानंतर मराठा समाजात काळजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार होऊन ते लवकर बरे होतील, अशी आशा बाळगली जात आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.