मनोज जरांगेंची प्रकृती खालवली, धनंजय देशमुखांसह ग्रामस्थ आणि महिला पण उपोषणाला बसणार, चौथ्या दिवशी घडामोड काय?
Manoj Jarange Hunger Strike Antarwali Sarati : मराठा आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबाजवणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी अंतरावाली सराटीतील काय आहे अपडेट?

मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी जुन्याच मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली. दीड वर्षांपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं वादळ निर्माण केलं आहे. आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत अनेक घडामोडी घडत आहेत.
धनंजय देशमुखसह मस्साजोगचे ग्रामस्थ सहभागी होणार
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावली, उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोरू धरू लागली आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपोषणात सहभागी होत आहे. मस्साजोग येथील महिला ही होणार आज उपोषणात सहभागी होत आहेत. आता सरकार बहुमताने आहे समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं उपोषणात सहभागी महिलांनी मागणी केली आहे.




सरकारने उपोषण गांभीर्याने घ्याव
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावं. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले.
आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेले पुरावे आहे त्यावर चर्चा करून निर्णय घेतील. आपली न्यायाची मागणी आहे आपण त्यावर ठाम आहोत मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी आहे बाकीचे निर्णय घेण्याचे काम त्यांच आहे. जे काही पुरावे दिले आहेत त्यावर चर्चा होईल, ते जे निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल, असे धनंजय देशमुख म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर यंत्रणेवरील दबाव तर शंभर टक्के कमी होणार आहे. मागच्या ज्या दहा दिवसातील घडामोडी आहेत व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप यावर गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी घडल्या त्या परत नाही घडल्या पाहिजे त्यामुळे यावर निश्चित दबाव कमी होईल, अशी प्रतिक्रिया देशमुखांनी दिली.