१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता…मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर

Manoj Jarange attack on Ladaki Bahin Yojana : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणक 2024 पूर्वी धुराळा उडवून दिला. आज त्यांनी दलित-मुस्लिम, मराठा समाजाची निवडणुकीसाठी मोट बांधण्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर थेट हल्लाबोल केला. काय म्हणाले जरांगे पाटील?

१५०० रुपये देऊन नादी लावताय काय? आता...मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं थेट शिंगावर
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 3:35 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पूर्वची बार उडवून दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आज त्यांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली त्यात दलित-मुस्लिम, मराठ्यांची एकत्रित मोट बांधण्याची घोषणा केली. त्यामुळे येत्या विधानसभेत समीकरणं बदलण्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता राज्य सरकारवर निशाणा साधला.

आता परिवर्तन होणार

तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं. ओबीसी, दलित, मराठ्यांना काय दिलं. ७५ वर्षापूर्वी विजेचा पोल टाकला. तो अजूनही तसाच आहे. तोही बदलला नाही. साधी कर्जमुक्तीही केली नाही. एक रुपयांचा पीक विमा गेला कुठे. हप्ते न भरल्याने पीक विमा देऊ शकत नाही असं कंपन्या म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही १५०० रुपये देऊन नादी लावत आहोत का? आता परिवर्तन होणार. सहन करण्याची क्षमता संपली. सुपडा साफ करणार म्हणजे करणार. सोडणार नाही. चिन्ह मिळाल्यावर आम्ही बोलू, असे ते म्हणाले.

आता 3 नोव्हेंबरला उमेदवार आणि मतदारसंघाची घोषणा

शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. मराठा, धनगर आणि ओबीसींचं वाटोळं केलं. विरोधक नव्हते तरीही त्यांनी आमच्यावर त्यांनी वार करायला नको होतं. हिन वागणूक द्यायला नको होती. आमच्या जनतेला त्रास दिला म्हणून हा उठाव झाला. आम्ही जागांच्या लफड्यात पडणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत. आम्ही कुणाला दादागिरी करणार नाही. तुम्ही उभं राहतं तसं आम्ही उभं राहणार नाही. कोण उभा राहील कोण नाही हे आम्ही ठरवणार. आचारसंहितेचे नियम पाळून काम करायचं आहे. गरीब माणूस उभा राहत असेल तर त्याला रोखू नका. तुम्ही मतदारांपर्यंत जा. आम्ही जाणार आहोत. धमकावू नका.

३ तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहोत. ४ तारखेला अर्ज मागे घेण्यात येईल. ज्यांना अर्ज मागे घ्या सांगितलं तर त्यांनी अर्ज मागे घ्यायचा. एकच उमेदवार राहील. बाकींच्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.