Manoj Jarange : दाजी एक दिवस तुम्हाला घोडे लावणार, मनोज जरांगे यांचा खणखणीत इशारा
Manoj Jarange on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला. मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केले.
मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने या आंदोलनाची समीक्षा करण्यात आली. त्यावेळी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केले. फडणवीस यांच्यामुळे राज्यात जातीय राजकारण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी फडणवीस यांच्यामुळेच मोठ्या समाजाचे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. येत्या निवडणुकीत काय होणार याचे गणितच त्यांनी मांडले. मराठे का केवळ दांडे हाती धरण्यासाठी आहेत का? मराठ्यांना गृहीत धरु देऊ नका, असा घणाघात त्यांनी केला.
दाजी घोडे लावणार
लाडक्या बहिणीला 1500 देतो, मग भाशाला काय आणि दाजीला काय? दाजी एक दिवस तुम्हाला घोडे लावणार आहे. आम्हाला कर्ज माफी, मालाला भाव, शेताला पाणी, 24 घंटे लाईट द्या. आम्हाला काहीही नको. आरक्षण दिल्यावर मराठा, धनगर मोठा होईल. दाजी आता रुम्हणे घेऊन उभा आहे. 1500 दिले मग, फडवणीस ने शेत विकून पैसे दिले का, असा सवाल त्यांनी केला. आरक्षण दिले की राजकीय बोलणे बंद. फडवणीस यांनी किती नेरेटिव्ह करु द्या, असे जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांना हलक्यात घेऊ नका
फडवणीस डेंजर माणूस आहे त्याला हलक्यात घेऊ नका, मोठ्या जाती संपवायला निघाला आहे, सर्व लोक त्याचा काटा काढणार आहेत. फडणवीस हा मित्र आणि शत्रू करायच्या लायकीचा नाही. फडवणीस यांनी भुजबळ यांच्या माध्यमातून जातीयवाद पसरवला. मी कट्टर हिंदू आहे, मला मराठा तसेच हिंदू म्हणून अभिमान, पण आम्हाला फक्त दांडके उचलायला लागतो का? असा सवाल त्यांनी विचारला. मराठा हिंदू मध्ये येत नाही का? बहुजन मध्ये मराठा आहे, मग इथेही आम्हाला विरोध केला जातो आम्ही हिंदु आहोत पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मान्य असल्याचे ते म्हणाले.
सोयीनुसार मराठा वागणार नाही
मराठी परप्रांतीय तिथेही मराठा लागतो तुमच्या सोयी नुसार आता मराठा वागणार नाही फडवणीस विचत्र आणि चभरा माणूस फडवणीस येड्या वाणी करतो बाकी गावागावातील देव बाप्पा चांगले आहेत या सरकारला असा कसा देव बाप्पा लाभला आहे, सुपाऱ्या कुठे आणि खारका कुठे ठेवायच्या. फडणवीस यांची इच्छा पूर्ण होऊ देऊ नका ही माझी विनंती, असे ते म्हणाले.