Manoj Jarange Patil : फडणवीस-महाजन पेंद्या-सुदामाची जोडी; मराठा आरक्षण दिले नाही तर…मनोज जरांगे यांचा खणखणीत इशारा

Maratha Reservation : जालना जिल्हा पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. अंतरवाली सराटी आणि आता वडी गोद्रीने राज्याचे लक्ष वेधले आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असे राज्यात ध्रुवीकरणाचा डाव सुरु आहे. त्यातच मनोज जरांगे यांनी शासनाला असा इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil : फडणवीस-महाजन पेंद्या-सुदामाची जोडी; मराठा आरक्षण दिले नाही तर...मनोज जरांगे यांचा खणखणीत इशारा
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 11:51 AM

जालना जिल्हा पुन्हा एकदा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मराठा आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षण यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पण राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही आरक्षणावरुन वातावरण तापणार असेच चित्र आहे.

ते तर पेंद्या सुदाम्याची जोडी

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे पेंद्या सुदाम्याची जोडी असल्याचा चिमटा जरांगे पाटील यांनी काढला. व्यवसायावर आरक्षण दिले आहे मग, मराठ्यांना आरक्षण का नाही? आम्हाला राजकारणात जायचे नाही, पण 13 तारखे पर्यंत आरक्षण दिले नाही तर पुढची भूमिका ठरवू असा इशारा पण त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

हाकेंनी आंदोलन करावे

आम्ही हाके यांना विरोधक मानत नाही, त्यांनी त्यांचे आंदोलन करावे. सग्या सोयऱ्याची आम्ही दिलेल्या व्याख्ये प्रमाणे घेतले तर आम्हाला मान्य आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही आदर करतो म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. हाके यांच्या आरक्षणाविषयी जरांगे पाटील यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.

यापूर्वीच्या आरक्षणाचे काय झाले 

यापूर्वी राज्य सरकारने 13 टक्के, 16 टक्के आरक्षण दिले होते, ते उडवले होते. 10 टक्के आरक्षण दिले होते परंतु ते द्यायचा आगोदर याचिका दाखल झाली होती आणि सग्या सोयऱ्याचे आरक्षण दिले तरी ते पण तेच उडवणार आहेत, असा स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी सरकारच्या धोरणावर आणि आश्वासनावर टीका केली.

फडणवीस यांच्यावर विश्वास पण…

13 तारखे पर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार फडवणीस यांच्यावर माझा विश्वास आहे. आम्हाला भिडवत ठेवतील तर हे पडतील. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर यांना 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी येत्या 13 तारखेपर्यंत सरकारला अवधी दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी राज्यातील दौऱ्याचे नियोजन सुद्धा केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.

Non Stop LIVE Update
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.