Raosaheb Danve : सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू-रावसाहेब दानवे

जो मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यानं मदत करत नाही, जो मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकवू शकला नाही त्यांच्यासाठी अच्छे दिन आले आहेत जनतेसाठी नाही, असेही दानवे म्हणले.

Raosaheb Danve : सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू-रावसाहेब दानवे
सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू-रावसाहेब दानवेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 5:09 PM

जालना : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुन्हा शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार (Mahavikas Aghadi) हल्ला चढवला आहे. शिवसेनेच लग्न आमच्यासोबत लग्न ठरले पण हे पळून गेले आणि दुसऱ्याशी लग्न लावले. असा टोला त्यांनी लगावला आहे. एका मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) पदासाठी सरकारमधील सर्व आमदार खासदार नाराज आहे. हे काय कोथळे काढतात आमचे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचे कोथळे आम्ही काढू म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिआव्हान दिले आहे. या राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मते दिली परंतु शिवसेनेनं बगावत केली, धोका दिला, असंगाशी संगत केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आणि या राज्यातील जनतेवर बुरे दिन आणले. जो मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यानं मदत करत नाही, जो मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकवू शकला नाही त्यांच्यासाठी अच्छे दिन आले आहेत जनतेसाठी नाही, असेही दानवे म्हणले.

सरकार अपयशी ठरले

तसेच आरक्षणावर बोलतना दानवे म्हणले, छगन भुजबळ यांनी केलेले आरोप बिन बुडाचे आहेत. इंपेरिकल डेटा द्यावा असे सुप्रीम कोर्ट मागत होते तो डेटा या सरकरला दोन वर्षात देता आला नाही. आता सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण संदर्भात निकाल दिल्यानंतर हे सरकार सात महिन्याची मुदत मागत आहे. आणि ही मागणी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे. हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. आणि या सरकार मधील ओबीसींचे नेते केवळ शोभेच्या वस्तू आहेत आणि यांचे सरकार मध्ये काही चालत नाही. आणि ओबीसी समाजावर अन्याय करणे या सरकारचे धोरण झाले आहे, असे म्हणत त्यांनी आरक्षणावरूनही सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

चोर पकडला गेला आहे

तर राज ठाकरेंना आम्ही पुढे आणले नाही, राज ठाकरे आमच्या फेवर मध्ये बोलले परंतु राज ठाकरे जेव्हा त्यांच्या फेवर मध्ये बोलत होते. तेव्हा राज ठाकरे चांगले होते आणि तुमचे कर्तृत्व पाहून ते विरोधात बोलत आहेत. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री व्हाव्या अशी मागणी एक वेळ झाली होती. आणि मुख्यमंत्रीपद कुण्याही जातीसाठी नसते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते परंतु आमचे मते चोरल्या गेली. परंतु आता चोर पकडला गेला आहे आणि येत्या काळात त्यांना शिक्षा मिळणार आहे, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.