Sambhaji Bhinde : संभाजी भिंडे यांची मिशी कापणाऱ्याला मिळणार एक लाखांचं बक्षीस, नेमकी कोणी केली घोषणा?
Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींनंतर महात्मा फुले आणि साई बाबांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केल्याने साई भक्तांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये. अशातच संभाजी भिडे यांची अर्धी मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
संजय सरोदे, जालना : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Sambhaji Bhinde Controversy Statement) काँग्रेस आणिस राष्ट्रवादीमधील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करत राज्य सरकारला कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींनंतर महात्मा फुले आणि साई बाबांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केल्याने साई भक्तांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये. अशातच संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पाहा नेमकी कोणी केलीये घोषणा केलीये.
कोणी केली घोषणा?
संभाजी भिडे यांची अर्धी मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा समता परिषदेच्या जालना येथील माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केलीय. सातत्याने महापुरुषांच्या वरती टीका करणाऱ्या भिडे यांना सरकार पाठीशी घालत असून, भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आव्हान आहे करत आहे. सर्व ओबीसी चळवळी मधील कार्यकर्त्यांकडुन एक-एक रुपया जमा करून हे एक लाख रुपये देण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलंय.
संभाजी भिंडेच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत. भिंडेंना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे. अशातच संभाजी भिडे यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, संभाडी भिडेंनी बंगालमधीस राजा राममोहन रॉय यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केलं आहे. भिडेंवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.