‘मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत आज मोठी घोषणा जाहीर करणार’, अर्जुन खोतकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य

| Updated on: Sep 04, 2023 | 2:55 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर आज अंतरवली सराटी गावात गेले. त्यांनी जरांगे यांना मराठा आरक्षणाचा मसुदा दाखवला. यावेळी खोतकरांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांची फोनवर बोलणं करुन दिलं.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत आज मोठी घोषणा जाहीर करणार, अर्जुन खोतकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Follow us on

जालना | 4 सप्टेंबर : मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय जाहीर करु शकतात. कारण शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अर्जुन खोतकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन अंतरवली सराटे गावात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. यावेळी अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांना मराठा आरक्षणाचा मसुदा दाखवला. त्यावर जरांगे यांनी काही दुरुस्ती सूचवली. त्यानंतर उद्या जीआर घेऊन खोतकर पुन्हा आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत. त्याआधी आज मुख्यमंत्री मोठी घोषणा जाहीर करणार असल्याचं खोतकरांनी सांगितलं आहे.

अर्जुन खोतकर नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांचा लढा अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेत आहेत. देशातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी, राज्यातील सर्व सन्मानिय मंत्री आणि इतर दिग्गज व्यक्तींसोबत बैठक सुरु होईल. थोड्या वेळात निर्णय येईल. मुख्यमंत्री ते बोलतील. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्याशी फोनवर बोलणं झालंय. मनोज पाटील यांना आश्वास्त केलं आहे.

मनोज पाटील यांच्या समाजाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्वत्र मान्यता आहे. विदर्भ आणि इतर भागात असताना फक्त आम्हाला निजाम संस्थेत असताना आम्हाला फायदा मिळू शकला नाही. त्यावेळचे सर्व वंशवळ तपासून समितीने हा निर्णय दिला आहे. मनोज पाटील यांना मी मसूदा वाचून दाखवला. त्यामध्ये मनोज पाटील यांनी बदल सांगितले. मनोज पाटील यांनी सांगितलं की, रात्री तातडीने मुंबईत जा.

मी तातडीने मुंबईत जातो. जो निर्णय झाला त्याचा तातडीने पहिला जीआर घेऊन येईन. मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. मनोज पाटलांची मागणी घेऊन मी आणि महादेव जानकर मुंबईला जातो. सर्वजण आपल्याला सकारात्मक सहकार्य करत आहेत. मनोज पाटील यांनी चर्चा करण्याची दारे खुली केली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मुख्यमंत्री आजच निर्णय घोषित करतील