सांगली : सांगली जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी (Terrorist attack) लढताना वीरमरण आलं. 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण (Romit Chavhan) जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील शोपिया या भागामध्ये दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन कारवाईच्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये सांगलीतील शिंगाव सुपुत्र, 1 राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. या घटनेमुळे गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. चव्हाणांशिवाय उत्तर प्रदेशातील एक जवानही या हल्ल्यात धारातीर्थी पडला.
पाच वर्षांपूर्वी रोमित मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्ष ट्रेंनिग झाले होते. तिथून त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली होती.
एक वर्षापूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफलमध्ये त्यांची पोस्टिंग झाली होती. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजली. त्यानंतर या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते.
यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे सांगलीतील राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर धाकटी बहीण शिक्षण घेत आहे. शिगाव गावासह पंचक्रोशीत ही बातमी पसरताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. या घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या :
शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्काराला जनसागर, अमर रहेच्या घोषणा
दिवाळीत आई-बहिणींकडून ऑनलाईन औक्षण, नाशिकचे शहीद जवान नितीन भालेरावांचा डोळे पाणावणारा व्हिडीओ
अखेरची भाऊबीज! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळले, शोकाकुल वातावरणात निरोप