जेव्हा जयंत पाटीलच आदिवासींच्या ‘भिलोरी’ भाषेत संवाद साधतात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नंदुरबारमध्ये चक्क आदिवासी बांधवांच्या स्थानिक 'भिलोरी' भाषेत संवाद साधला.
नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नंदुरबारमध्ये चक्क आदिवासी बांधवांच्या स्थानिक ‘भिलोरी’ भाषेत संवाद साधला. यामुळे त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्वांची मने जिंकली. या भेटीत त्यांनी नंदुरबार येथे राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठकही घेतली. ते सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे अंतर्गत विविध ठिकाणी भेट देत आहेत (Jayant Patil speak in tribal Bhilori language in Nandurbar).
जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौदाव्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात पोहचले. यावेळी त्यांनी स्थानिक आदिवासींसोबत त्यांच्याच भाषेत गप्पा मारल्या. राज्याचे महत्त्वाचे मंत्री असलेल्या व्यक्तीनेच आपल्या भाषेत संवाद साधल्याने स्थानिकही भारावले. जयंत पाटलांनी नंदुरबारमधील आदिवासी बांधवांशी त्यांच्या भाषेत चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेत आज साक्री विधानसभा मतदारसंघाचा प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी आढावा घेतला. संघटना वाढवण्यासाठी विशेष काळजी घ्या, तालुकास्तरावर बैठकांचे आयोजन करा, आदिवासी भागातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी केल्या. pic.twitter.com/nVvWg6CP9G
— NCP (@NCPspeaks) February 10, 2021
खरं म्हणजे जयंत पाटलांनी आधी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाए स्थानिकांशी मराठी भाषेत बोलायला सुरुवात केली. मात्र, आदिवासी बांधव आणि महिलांना ही भाषा समजताना कठीण जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जयंत पाटील यांनी आदिवासी बांधवांच्या स्थानिक ‘भिलोरी’ भाषेला हात घातला. इतकंच नाही तर याच भाषेत स्थानिकांशी चर्चा केली.
जयंत पाटील यांनी आपल्या स्थानिक ‘भिलोरी’ भाषेत संवाद साधल्याने तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. तसेच मंत्र्याने आपल्याला समजावं म्हणून केलेल्या प्रयत्नांचंही स्थानिक पातळीवर कौतुक होतंय.
हेही वाचा :
VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात
शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, जयंत पाटलांची टीका
व्हिडीओ पाहा :
Jayant Patil speak in tribal Bhilori language in Nandurbar