Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल महाआघाडीच्या बाजूने लागला. त्याचा आनंद आहे. महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं. पुरोगामित्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे, याचे द्योतक हा निकाल आहे.

Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली
Kolhapur North By Election 2022 : चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं, मीही सोबत येईल; जयंत पाटलांनी उडवली खिल्लीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:20 PM

पुणे: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kolhapur North Election Result) निकाल महाआघाडीच्या बाजूने लागला. त्याचा आनंद आहे. महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं. पुरोगामित्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे, याचे द्योतक हा निकाल आहे. करवीर नगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात त्यांना चपराक मिळाली आहे. कार्यकर्त्यांच्या कामामुळे विजय झाला. पराभव एका मताने केला काय आणि हजाराने केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत दादांना (chandrakant patil) हाही मतदार संघ सोडावा लागेल असं वाटतंय. इतकी आपुलकी इथे दिसतेय. ही संधी होती निवडणुकीला उभं राहायची, असं सांगतानाच चंद्रकांतदादांनी खरोखरच हिमालयात जावं. मी त्यांच्याबरोबर जाऊन येईल. काय कसं? कुठं ते बघायला. दादांचे आणि माझे सलोख्याचे संबंध आहेत. दादा जाणार असतील तर मीही जाईन. माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी लगावला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. धुळ्यात जी घटना झाली ती मुद्दाम दंगल झाली. महाविकास आघाडीचे आमदार, पक्ष फोडायचे काम झाले. आता दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुय. पण आम्ही खंबीर आहोत, असं जयंत पाटील म्हणाले.

आमच्यात हिंदुत्वाचा भाग आहे

प्रत्येकाची श्रध्दा असते. आमचीही रामावर श्रद्धा आहे. आमच्यात हिंदुत्वाचा भाग आहे तो आहेच. पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आमच्यावर आहे, असं सांगतानाच 30 वर्ष यांना हनुमान चालीसा आठवला का नाही? असा सवाल त्यांनी केला.

चड्डी घेऊन फिरत होता तेव्हाच्या गोष्टी

भाजप जे सांगताहेत ते हे करताहेत. तिकडे ओवेसी बोलतात. थोड्या दिवसाने ओवेसी पिक्चरमध्ये येतील. या राज्यात तणाव निर्माण करण्याचा आणि त्या पुढे जाऊन काही तरी अघटीत घडवण्याचा या प्रयत्नांची सुरुवात आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांवर बोलणं किंवा जुन्या गोष्टी उकरुन काढणं म्हणजे ते चड्डी घालून जेव्हा फिरत होते तेव्हाच्या गोष्टी सांगताहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya : ‘सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच’, हनुमान जयंती दिनी सोमय्यांचा दावा, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Kolhapur Election Result 2022 LIVE : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला पुन्हा “अच्छे दिन”, कमळ पुन्हा “कोमेजलं”

Kolhapur By Election Result 2022 : हिंदुत्व आमचा अजेंडा नाही, कोल्हापुरच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचं बंटी पाटलांना तीन मुद्यात उत्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.