गुजरातचा ‘पुष्पा’ बनला भाजपचा डोकेदुखी, कॉँग्रेसच्या तिकिटावर तरुण नेता मैदानात!

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील दलित समाजाचे एक मोठे नेते असून दलित समाजासाठी ते काम करत असून त्यांच्या मतदारसंघात अनेकांचे लक्ष लागून आहे.

गुजरातचा 'पुष्पा' बनला भाजपचा डोकेदुखी, कॉँग्रेसच्या तिकिटावर तरुण नेता मैदानात!
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 3:36 PM

मुंबई : गुजरातच्या 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात कॉँग्रेस तीन तरुण चेहरे मैदानात उतरवले होते. जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूर. ह्या तिघांनी कॉँग्रेसला सत्ता दिली नाही, पण भाजपची अडचण वाढवत 99 जागांवर विजय मिळवत समाधान मानावे लागले होते. भाजपाला सत्ता मिळाली होती त्यात त्यांनी कामे केली कि नाही हा मुद्दा गौन असला तरी कॉँग्रेसच्या त्या तीन चेहऱ्यांपैकी अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल भाजपमध्ये गेले आहे. तर कॉँग्रेसमध्ये फक्त जिग्नेश मेवाणी राहिले आहे. जे भाजपच्या विरोधात नेहमी आक्रमक असतात. 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. नंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत गरीवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. तरीही जिग्नेश मेवाणी यांनी भाजपवर हल्लाबोल करण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

होऊ घातलेल्या गुजरात निवडणुकीत अनेक दिग्गज नेते निवडणुकीत आपलं नशीब आजमावत असून त्यापैकी एक जिग्नेश मेवाणी आहेत. कॉँग्रेसच्या टिकीटावर वडगाम विधानसभा क्षेत्रातून जिग्नेश मेवाणी निवडणूक लढवत आहे.

जिग्नेश मेवाणी हे वडगाम विधानसभा मतदार संघाचे यापूर्वी आमदार होते. आता कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असतांना त्यांच्याकडे काँग्रेसच्या गुजरात प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार देखील आहे.

हे सुद्धा वाचा

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील दलित समाजाचे एक मोठे नेते असून दलित समाजासाठी ते काम करत असून त्यांच्या मतदारसंघात अनेकांचे लक्ष लागून आहे.

जिग्नेश मेवाणी यांचा जन्म हा 1980 सालातील आहे. गुजरातमधील मेहसाना या गावात त्यांचा जन्म झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मेवाणी यांचे वडील नटवरभाई परमार अहमदाबाद पालिकेत क्लार्क म्हणून कार्यरत होते.

जिग्नेश मेवाणी यांनी आपले आडनाव बदलून ज्या गावाचे ते आहेत, त्या गावाचे नाव आडनाव म्हणून त्यांनी आडनाव लावले आहे. असून गावाशी कायम जोडलेले असावे म्हणून त्यांनी हे नाव लावले आहे.

जिग्नेश मेवाणी यांनी खरंतर नुकताच कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कन्हैय्याकुमार यांच्या प्रवेशावेळी जिग्नेश मेवाणी प्रवेश करणार होते. मात्र आमदारकी अडचणीत येईल म्हणून त्यांनी पक्षप्रवेश करणं टाळलं होतं.

जिग्नेश ने महात्मा गांधीची प्रेरणा घेऊन दलित अस्मिता यात्रा काढत 20 हजार दलीतांनी यात्रा काढत मेलेले जनावर उचलणार नाही अशी शपथ घेतली होती.

सुरुवातीला त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा तयार केला होता. त्यावरून त्यांना मुंबईत नोकरीही लागली होती. त्यानंतर त्यांनी लॉ कॉलेजला देखील प्रवेश घेतला होता. मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी गुजरात हाईकोर्टचे वकील बनले होते.

2016 मध्ये ऊना शहरामध्ये दलितोंसोबत मारपीटची घटना घडली होती, त्यानंतर जिग्नेश मेवाणी हा मोठा चेहरा बनला होता. त्यानंतर आता कॉँग्रेससह गुजरातमधील दलिता नेता म्हणून जिग्नेश यांची ओळख निर्माण झाली आहे.

2017 च्या गुजरात निवडणुकीत जिग्नेश मेवाणी बनसकांठा के वडगाम मधून कॉँग्रेसच्या समर्थनावर निवडणूक लढले होते, त्यात त्यांनी 18 हजार अधिकचे मते घेऊन विजय मिळवला होता. तिथूनच त्यांची राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आहे.

पुन्हा एकदा जिग्नेश मेवाणी हे स्वतः कॉँग्रेसला यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहे, गेल्या अनेक वर्षांचा कॉँग्रेसचा गुजरातमधील वनवास संपविण्यासाठी मेवाणी प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.