सदावर्ते यांनी दारू पिऊन काय केलं होतं? आव्हाड यांनी ती आठवण करून देत सदावर्ते यांचं प्रयोजनच सांगितलं
गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपावरुन संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेत राडा करत सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकली आहे. त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी ब्रिगेड ही पिलावळ शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची असल्याचे म्हंटले होते.
ठाणे : सोलापूर येथील पत्रकार परिषदेच्या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली असून गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करत ते महाराष्ट्र तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकूणच सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेतच हा राडा झाला आहे. पाठीमागे उभे असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शाईफेक केली आहे. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी यामागे शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा आरोप केला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सदावर्ते यांच्या भूमीवर बोलत असतांना शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे. गुणरत्न सदावर्ते हा फार छोटा माणूस आहे त्याच्या मला बोलायचे नाही असंही आव्हाड यांनी म्हंटले आहे. याशिवाय गुणरत्न सदावर्ते याने दारू पिऊन एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवार यांच्या घरावर हल्ला करायला लावला त्याच्या बद्दल बोलायचे नाही असं म्हणत आव्हाड यांनी म्हंटले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपावरुन संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषदेत राडा करत सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकली आहे.
त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी ब्रिगेड ही पिलावळ शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची असल्याचे म्हंटले होते.
सदावर्ते यांनी केलेल्या आरोपवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदावर्ते यांच्यावर दारू पिण्याचा आरोप करत हल्ला कसा घडवून आणला होता याची आठवण करून देत सरकारला चिमटे काढले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांच्या आरोपावर मी बोलावं एवढा तो मोठा नाही, त्यामुळे सरकारचे ते कट्टर समर्थक आहे, ते याबाबत तपास करतील, हे प्रकरण चिघळण्याचे कारणचं नाही.
गुणरत्न सदावर्ते यांनी दारू पिऊन शरद पवार यांच्या घरावर एसी कर्मचाऱ्यांना हल्ला करायला सांगितला होता, त्यावर बोलण्यात वेळ वाया घालवणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.