नवी मुंबईत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचं ‘मिशन लसीकरण’ जोरात!
राज्यात कोरोना रुग्णसंख्या (Corona Updates in Maharashtra) जरी वाढत असली तरी लसीकरण (Vaccination) मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. Jumbo Covid Vaccination Center in Navi Mumbai turbhe
नवी मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या (Corona Updates in Maharashtra) जरी वाढत असली तरी लसीकरण (Vaccination) मोहिमेने चांगलाच वेग धरला आहे. राज्यातील विविध शहरामध्ये लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इकडे नवी मुंबईत देखील आयुक्त अभिजित बांगर (IAS Abhijeet Bangar) यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून तुर्भे सेक्टर 19 येथील एक्स्पोर्ट हाऊसमध्ये ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’ सुरु होत आहे. गेली एक वर्षभर राज्यातील अनेक शहरांत जम्बो कोव्हिड रुग्णालये सुरु झाली. परंतु आता तुर्भेत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’ सुरु होत आहे. (Jumbo Covid Vaccination Center in Navi Mumbai turbhe)
तुर्भे येथे 15 बुथ टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचे नियोजन असून उद्यापासून पहिल्या टप्प्यात 2 शिफ्टमध्ये 4 – 4 असे 8 बुथ कार्यरत होणार आहेत. 12 तास कार्यरत असणा-या या जम्बो लसीकरण केंद्रामध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 4 बुथ तसेच दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत 4 बुथ लसीकरणासाठी सज्ज असणार आहेत.
लसीकरणाला वेग
प्रत्येक बुथवर प्रतिदिवस प्रतिबुथ 100 लाभार्थी अपेक्षित असून उद्या एक्पोर्ट हाऊस मधील जम्बो कोव्हीड लसीकरण केंद्राच्या एकाच ठिकाणी 800 लाभार्थ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. या जम्बो लसीकरण केंद्रामुळे नवी मुंबईतील लसीकरण प्रक्रियेला आणखी वेग मिळणार आहे व नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
लसीकरणाची स्थिती काय?
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 22 रूग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे तसेच 15 खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड 19 लसीकरण केले जात असून 18 मार्चपर्यंत 59494 लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
लसीकरणात सुरळीत व्हावं यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांचं विशेष लक्ष
लसीकरणासाठी नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हावी याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे विशेष लक्ष असून नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरिता महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे, 18 नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठीही 1 दिवस वाढवून आता सोमवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार असे 4 दिवस लसीकरण करण्यात येत आहे.
(Jumbo Covid Vaccination Center in Navi Mumbai turbhe)
हे ही वाचा :
Corona Cases and Lockdown News LIVE: वसई-विरार-नालासोपारा क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ