Kagal Assembly Election Results 2024: हसन मुश्रीफ की समरजित घाटगे, कागलमध्ये विजयाचा गुलाल कुणाचा? अखेर निकाल हाती
Kagal Assembly constituency :शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यासाठी यंदाची कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. निवडणुकीच्या रणधुमाळीत समरजीतसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर या जागेचा निकाल समोर आला आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून मतमोजणीस सुरूवात झाली आहे. एकेका मतदारसंघाचा निकाल समोर येण्यासही सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक बिग फाईट्स पहायला मिळाल्या, त्यापैकी एक म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणूनही ओळखलं जातं. कागलची यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत महायुती वि महाविकास आघाडी असा सामना रंगला. शरद पवारांनी कोल्हापूर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि तरुण नेते समरजितसिंह घाटगे यांच्या हाती तुतारी देऊन भारतीय जनता पक्षाला मोठा दणका दिला. तेथे हसन मुश्रीफ वि. समरजित घाटगे अशी मोठी लढत पहायला मिळाली.
हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात घाटगेंची धडक
खरंतर कागल हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला, तेथून ते सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे महायुतीमधील कागल विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे स्पष्ट झालं होतं.
कागलमधील घाटगे घराणं हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं. या कुटुंबाने कायमच शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घराण्याचा मोठा मान आहे. विक्रमसिंह घाटगे. 1978 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सध्या कागल विधानसभा मतदारसंघात चर्चेत असलेले समरजितसिंह घाटगे यांचेच सुपुत्र आहेत. शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात त्यांचा विशेष प्रभाव दिसतो.
मात्र महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमधून समरजितसिंह घाटगे हे देखील कागलमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने ते नाराज झाले. म्हणूनच ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यातच शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणुकीआधीच तलवार म्यान केली. अखेर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना हसीन मुश्रीफांविरोधात उमेदवारी देण्यात आली. अखेर आज या जागेचा निकाल आता समोर आला आहे.
कागल विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting
विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE