अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, फेरिवाला केवळ एक कारण, कल्पिता पिंपळेंचा खळबळजनक दावा

पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय.

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, फेरिवाला केवळ एक कारण, कल्पिता पिंपळेंचा खळबळजनक दावा
कल्पिता पिंपळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 8:32 PM

ठाणे : महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता. ठाण्यातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु असताना कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याचं एक बोट तुटलं आहे. पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Kalpita Pimple’s sensational claim that she was attacked due to action against unauthorized construction)

“या हल्ल्यात माझी दोन बोटं माझी गेली. पण केवळ फेरिवाल्यांवर कारवाई होती म्हणून दोन बोटं गेली, असा प्रकारचा एक समज निर्माण झालेला आहे. याबाबत मला थोडसं सांगायचं आहे की, आमच्या ज्या बदल्या झाल्या आणि आम्ही जी अनधिकृत बांधकामं तोडायला सुरुवात केली. मी आल्यानंतर बाळकुम, कासारवडवली या भागात सात मजली, पाच मजली इमारती तोडायला सुरुवात केली. त्यानंतर अनधिकृत ढाब्यांवर कारवाई केली. त्यानंतर मी फेरिवाल्यांना हात घातला हे सर्वांना माहिती आहे. फेरिवाल्यांना जर निषेध नोंदवायचा असता तर जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असती. माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला असता. सगळी कारवाई झाली. त्यानंतर मी जेव्हा तिथे गेले, माझ्या गाडीतून उतरले त्यानंतर 4-5 मिनिटांनी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्यामागे मला फेरिवाला वाटत नाही. आम्ही जी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत, ती कारवाई कुठेतरी थांबावी असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे हा हल्ला झाला असं मला वाटतं”, असा संशय कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचं आश्वासन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 सप्टेंबर रोजी कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. “जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तु्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्री पिंपळे यांना म्हणाले होते.

राज ठाकरेही फेरिवाल्यांविरोधात आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 सप्टेंबर रोजी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जात भेट घेतली होती. त्यावेळी पिंपळे यांच्या तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले होते.

इतर बातम्या :

Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन

Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणते 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.