NCP Crisis | आमदार नितीन पवार यांनी अखेर पत्रावर सही करण्यामागच सत्य काय ते सांगितलं? VIDEO
NCP Crisis | ज्या आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली, त्यांना कुठलीही कल्पना नव्हती, असं शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अखेर त्या मागच सत्य समोर आलय.
मुंबई : महाराष्ट्रात काल मोठं राजकीय बंड पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. यापुढच्या सगळ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढवणार असल्याच अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे पुढचे काही दिवस शरद पवार-अजित पवार या काका-पुतण्यामधील संघर्ष महाराष्ट्राला पाहायला मिळेल. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक वाढत जाईल.
आमदारांना पत्रावर स्वाक्षरी करताना कल्पना नव्हती?
अजित पवार यांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. 30 ते 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याच बोललं जातय. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी आमदारांची एका पत्रावर स्वाक्षरी घेतली होती. ज्या आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली, त्यांना कुठलीही कल्पना नव्हती, असं शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
आमदार नितीन पवार काय म्हणाले?
आता कळवणचे आमदार नितीन पवार यांना पत्रावरील स्वाक्षरी संबंधी टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने विचारलं. त्यावर त्यांनी ‘स्वाक्षरी घेताना माहिती दिली होती. पत्र वाचून दाखवलं होतं’ असं उत्तर दिलं. “आम्हाला शनिवारी संध्याकाळी फोन आला. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे मी सकाळी गेलो नाही. संध्याकाळी जाऊन दादांची भेट घेतली” असं नितीन पवार म्हणाले. अभ्यास करुनच निर्णय
“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. मतदारसंघात विकास करायचा आहे, ते दादाच करु शकतात” असं नितीन पवार म्हणाले. “काही टेक्निकल अडचण येईल, असं वाटत नाही. अभ्यास करुनच दादांनी हा निर्णय घेतलाय” असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यासोबत का गेले? या प्रश्नावर ते म्हणाले की, “अडीच वर्षाच्या कार्यकाळात दादांनी विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आमदार दादांसोबत गेले”