नरेंद्र मोदींना पाहिलं की मला…; एकनाथ शिंदे यांनी कोणती कविता म्हटली?

CM Eknath Shinde on PM Narendra Modi Loksabha Election 2024 : श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींना पाहिलं की मला...; एकनाथ शिंदे यांनी कोणती कविता म्हटली?
CM Eknath Shinde on
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 7:58 PM

कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता म्हटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघून प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांची कविता आठवते. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक

नरेंद्र मोदी कल्याणमध्ये आल्याने माहौल तयार झालाय. आपण जिंकल्यात जमा आहे. कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रीक करणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदेना मत म्हणजे मोदींना मत… भरकटलेले विरोधी पक्ष मोदींच्या नावानं शिव्या शाप देत आहेत. पण एक अकेला मोदी कितनों को भारी पडत आहे. एक बार कह दिया तो कह दिया… या देशात राम मंदीर बांधणार म्हणाले, त्यांनी ते पूर्ण केलं, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

ते स्वप्न पूर्ण करणारच- शिंदे

नरेंद्र मोदींनी देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न पाहिलंय. ते स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करणार म्हणजे करणार. देश कसा पुढे न्यायचा यांचं व्हिजन ते मांडतात. काम करणारे भारताला नवी दिशा देणारे नरेद्र मोदी.. भष्ट्राचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी. देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब मांडणारे नरेंद्र मोदी. विकासासोबत पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

शिंदेंचं आवाहन काय?

140 कोटी जनेतनं नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याची गॅरंटी घेतलीय. इंडिया आघाडी पूर्णपणे बिथरलेली आहे. पाकिस्तानाचे हुजरेगिरी ठाकरे गटाने सुरू केलीय. ठाकरे गटाच्या रँलीत पाकिस्तानाचे झेंडे फडकताहेत. आपलं मत काँग्रेसला देणार असं सांगतात. बाळासाहेबांना कधी वेदना होत असतील. नरेंद्र मोदींचे हात बळकट करा. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.