Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संताप

गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेक जण मंगळवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाहेर पडले (Kalyan Girl angry at Uddhav Thackeray)

VIDEO | उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संताप
कल्याणच्या तरुणीचा मुख्यमंत्र्यांवर संताप
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 12:21 PM

कल्याण : लॉकडाऊनच्या भीतीने अनेक जणांनी घरात किराणा माल-भाजीपाला भरण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे. डी मार्ट (DMart) या सुपरमार्केटच्या देशभरातील विविध भागातील दुकानांबाहेरही ग्राहकांच्या रांगा लागल्या. डीमार्ट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे कल्याणमधील तरुणीचा संताप झाला. ‘किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? असं नाही की उद्धव काका घरी किराणा पाठवणार?’ अशा शब्दात तरुणीने आपला राग थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरच व्यक्त केला. (Kalyan Girl angry at CM Uddhav Thackeray after DMart decides to keep shop down)

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेक जण मंगळवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाहेर पडले. कल्याणचा डी मार्ट समोर खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली.

डी-मार्ट बंद झाल्याने ग्राहकांचा संताप

एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. अखेर प्रशासनाने डीमार्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. डी-मार्ट बंद झाल्यानंतरही ग्राहक रस्त्यावरच उभे राहिले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी दिसत होती. सर्व बंद केल्यानंतर आम्ही जेवणार काय असा संतप्त सवाल नागरिक करत होते.

“किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय?”

“दोन-तीन दिवस झाले, आम्ही नंबर घेतोय, कॉल करतोय, नंबर मिळत नाहीये. इथे आलो, रांग लावली. कूपन मिळत नाहीये. मग किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? ठीक आहे लॉकडाऊन आहे, आम्ही घरी बसतो, घरात बसून पाणी तर पिणार नाही ना? खायला लागेल. किराणा दुकान बंद, डी मार्ट बंद, मग जायचं कुठे? असं नाही की उद्धव काका घरी पाठवणार आहेत किराणा? नाहीतर घरपोच सेवा करा, आम्ही खाऊ घरी. गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांना किराणा नाहीये घरी. मग करायचं काय?” असा सवाल तरुणीने विचारला. (Kalyan Girl angry at CM Uddhav Thackeray after DMart decides to keep shop down)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या:

… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

(Kalyan Girl angry at CM Uddhav Thackeray after DMart decides to keep shop down)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.