दोघांनी रक्ताचे डाग पुसले, मृतदेह फेकला अन् दारु घेऊन…; कल्याण अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर

काल कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी साक्षी गवळीला राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. यावेळी आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला.

दोघांनी रक्ताचे डाग पुसले, मृतदेह फेकला अन् दारु घेऊन...; कल्याण अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर
kalyan crime
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 5:27 PM

Kalyan Minor Girl Murder Case Update : कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीला अटक करण्यात आली. विशाल गवळीसह त्याची बायको साक्षी गवळीलाही अटक करण्यात आली. याप्रकरणी साक्षी गवळीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता सखोल पोलीस तपास सुरु आहे. या तपासावेळी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

कल्याण अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साक्षी गवळी ही विशाल गवळीची तिसरी पत्नी आहे. तिने हत्येनंतर मुलीचा मृतदेह कब्रस्तानमध्ये फेकण्यासाठी मदत केली होती. याप्रकरणी काल कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी साक्षी गवळीला राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. यावेळी आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला.

पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

आरोपी विशाल गवळीने संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मुलीला घरी घेऊन आला. त्यानंतर त्याने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये छिन्नविच्छिन्न अवस्थेत मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. यानंतर साक्षी खासगी बँकेतून कामावरुन घरी आली. संध्याकाळी सात वाजता ती घरी आल्यानंतर त्याने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला, असे पोलिसांनी सांगितले.

मी हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर हैराण झाली. यानंतर सात वाजता आम्ही दोघेही पती-पत्नी यांनी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे, याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री साडेआठ वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. यानंतर नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले आणि मृतदेह फेकून दोघे परतले. परतत असताना विशाल याने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी येथेच राहिली, असेही पोलिसांनी म्हटले.

विशाल गवळीलाही अटक

याप्रकरणी विशालच्या घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली. यावेळी तिने याप्रकरणाचा उलगडा केला. तर दुसरीकडे आज शेगावमधून विशाल गवळीलाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्याला उद्या कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.