Kalyan : प्रियकराने तलावात उडी मारल्याच्या गैरसमजातून गोंधळ, प्रेयसीचीही तलावात उडी, विचित्र घटनेने खळबळ

का तरुणाने तलावात उडी मारली', हे ऐकून एक तरूणी हबकली. आपल्या प्रियकराने तलावात उडी मारल्याचा प्रेयसीचा गैरसमज झाला आणि त्या तरूणापाठोपाठ त्या तरूणीनेही तलावात उडी मारली.

Kalyan : प्रियकराने तलावात उडी मारल्याच्या गैरसमजातून गोंधळ, प्रेयसीचीही तलावात उडी, विचित्र घटनेने खळबळ
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 9:27 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 9 जानेवारी 2024 : कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात एक विचित्र घटनेने खळबळ उडाली. ‘ नांदिवली परिसरात एका तरुणाने तलावात उडी मारली’, हे ऐकून एक तरूणी हबकली. आपल्या प्रियकराने तलावात उडी मारल्याचा प्रेयसीचा समज झाला आणि त्या तरूणापाठोपाठ त्या तरूणीनेही तलावात उडी मारली. मात्र तेथेच असलेल्या एका तरूणाने प्रसंगावधान दाखवत पाण्यात उडी मारून त्या तरूणीला वाचवलं. मात्र तलावात बुडालेला तरुण माझा प्रियकर आहे असं सांगत त्या तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात बुडलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. आणि त्याच वेळी त्या तरूणीचा प्रियकरही तिच्या समोर आल्याने तिचा गैरसमज दूर झाला. मात्र अनेक तास चाललेल्या या गोंधळामुळे, या विचित्र घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं ?

कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात काल सायंकाळच्या सुमारास महेश भाटिया हा तरुण पोहण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दुसरीकडे एका व्यक्तीने पाण्यात उडी मारल्याची माहिती त्या परिसरात राहणाऱ्या एका तरूणीने ऐकली. आपल्याच प्रियकराने पाण्यात उडी मारली असा तिचा गैरसमज झाला आणि तिनेही तलावाच्या दिशेने धाव घेत पाण्यात उडी मारली.

मात्र त्याच तलाव परिसरात राहणाऱ्या शुभम शेट्ये नावाच्या तरुणाने धाडस दाखवित तिला सुखरूप तलावातून बाहेर काढले. पण तलावात बुडालेला तरुण माझा प्रियकर आहे असं सांगत तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात बुडलेल्या तरुणाचे मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तो तरूण दुसरा कोणी असल्याचे तिला समजले. आणि त्याच वेळी तिचा प्रियकरही समोर आल्याने त्या तरूणीचा गैरसमज दूर झाला. मात्र या विचित्र घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.