VIDEO : कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवारांच्या जीवाशी; कल्याणमध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले

कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवारांच्या जीवाशी बेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.

VIDEO : कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवारांच्या जीवाशी; कल्याणमध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 8:51 AM

Kalyan west constituency : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवारांच्या जीवाशी बेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.

विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या जीवावर बेतले.

फटाक्यांची ठिणगी डोक्यावर उडाली अन्…

जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. या हारासोबत काही इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाके लावण्यात आले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर उडाली.

यानंतर क्षणार्धात राकेश मुथा यांच्या केसांनी पेट घेतला. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून ही आग विझवली. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा कशाप्रकारे धोका निर्माण करू शकतो, याचा जिवंत पुरावा यामुळे मिळाला.

कल्याण पश्चिममध्ये कोणाची लढत?

दरम्यान कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर हे मैदानात उतरले आहे. त्यासोबतच मनसेकडून उल्हास भोईर हे रिंगणात उतरले आहे. सध्या या सर्वांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे कल्याण पश्चिममध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.