Kamboj on Lakdawala : लकडावालांशी गांधी, पवार, राऊत, मातोश्रीचे संबंध; कंबोज यांच्याकडून फोटासहीत पोलखोल

भाजप नेते मोहित कंबोज म्हणाले की, अहमद पटेल, संजय राऊत, शरद पवार राजीव गांधी या सगळ्यांचे युसूफ लकडावालाशी चांगले संबंध आहेत. मातोश्रीवर त्यांचे नेहमीच येण - जाणे होते. त्याबद्दल काय बोलणार. संजय राऊत हे पवारांची खुर्ची उचलतात, तर मग त्यांनी लकडावालाची खुर्ची उचलली असेल. ईओडब्ल्यूची चौकशी करायची आहे, तर करा ना कोण अडवले आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

Kamboj on Lakdawala : लकडावालांशी गांधी, पवार, राऊत, मातोश्रीचे संबंध; कंबोज यांच्याकडून फोटासहीत पोलखोल
शरद पवारांच्या शेजारी निळ्या कोटमधील युसूप लकडावाला.
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 3:36 PM

मुंबईः संजय राऊत, अहमद पटेल, शरद पवार (Sharad Pawar), राजीव गांधी (Rajiv Gandhi) या साऱ्यांचे युसूफ लकडावालांशी (Yusuf Lakdawala) चांगले संबंध होते आणि आहेत. त्यांच्या महाबळेश्वरच्या हॅाटेलवर संजय राऊत अनेकदा जाऊन राहतात. लकडावालांचे मातोश्रीवर नेहमीच येणे – जाणे होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्या दाव्यासाठी त्यांनी काही फोटोचे पुरावेही दिलेत. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोंग्यापासून सुरू झालेले वाकयुद्ध हनुमान चालिसेपर्यंत पोहचले. त्यामुळे राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले. या राणा दाम्पत्याचे युसूफ लकडावालाशी कसे संबंध आहेत आणि तो धागा अंडरवर्ल्डपर्यंत कसा पोहचतो, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याच आरोपाला आज मोहित कंबोज यांनी सडेतोड उत्तर दिले.

सलीम-जावेदच्या गोष्टी…

मोहित कंबोज म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात, हे त्यांनाच कळत नाही. त्यांनी सलीम – जावेदच्या गोष्टी आता बंद कराव्यात. ज्यांना काही कळत नाही, ते राज्यसभेचे एवढे वर्ष खासदार कसे काय होतात, हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती. युसूफ लडकवाला यांच्याकडून राणा पती – पत्नींनी हा फ्लॅट विकत घेतला होता. त्यांचे खारमधील घर हे युसूफ लकडवाला यांनी उभे केले होते. त्यांनी त्या फ्लॅटचे पैसे युसूफ लडकावाला यांना दिले. उगाच दोन मिनिटांसाठी खालच्या पातळीवर राजकारण करणारे राऊत यांना सिरियस्ली घ्यायची गरज नाही.

राऊतांचे लकडावालाशी संबंध…

कंबोज म्हणाले की, त्यांचे स्वतःचे घोटाळे बाहेर आले. प्रॅापर्टी जप्त झाली. त्याबद्दल काय बोलणार. युसूफ लकडावालाचे आणि संजय राऊत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यांच्या महाबळेश्वरच्या हॅाटेलवर राऊत अनेकदा जाऊन राहतात. अहमद पटेल, संजय राऊत, शरद पवार राजीव गांधी या सगळ्यांचे युसूफ लकडावालाशी चांगले संबंध आहेत. मातोश्रीवर त्यांचे नेहमीच येण – जाणे होते. त्याबद्दल काय बोलणार. संजय राऊत यांना स्वतःच्याच विधानवरून माघार घ्यावी लागेल, असा दावाही त्यांनी केला.

कारवाईत भेदभाव कशासाठी…

कंबोज म्हणाले, संजय राऊत हे पवारांची खुर्ची उचलतात, तर मग त्यांनी लकडावालाची खुर्ची उचलली असेल. ईओडब्ल्यूची चौकशी करायची आहे, तर करा ना कोण अडवले आहे, तक्रारदार कोण आहेत, पण मुंबईत माझ्यावर हल्ला झाला. किरीटजीवर हल्ला झाला. सगळे जण याबद्दल बोलत आहेत. पुरावे आहेत तर मग काय कारवाई केली. संजय पांडेंनी भाजप नेत्यांसोबतच्या कारवाईत भेदभाव का केला, असा सवाल त्यांनी केला.

आयुक्तांना राजकारणाचे वेध…

कंबोज म्हणाले, संजय पांडे यांना आता राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यांनी थेट मैदानात यावे. आम्ही दोन हात करायला तयार आहोत. मुंबई पोलिसांचे आयुक्त स्वतःच्या अकाऊंटवरून का बोलतात? माणूस मेल्यावरच गुन्हा दाखल करणार का ? जखमी किती झालाय यावर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.