कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली; कारचालक जागीच ठार; महिला गंभीर जखमी
कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाट असून या घाटाच्या धोकादायक वळणामुळे अनेक अपघात होत असतात. आज झालेला हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कराडः कराड-चिपळूण मार्गावर (Karad-chiplun Road) कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat) कारचा भीषण अपघात झाला आहे. या घाटातील एक मोठया वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून इंडिका झेड ही कार (Car Accident) दोनशे फूट खोल दरीत कोसळून कारच्या चालक ठार झाला आहे. तर त्याच्या शेजारी बसलेली महिला जखमी झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह अलोरे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने दरीतून जखमी महिलेला रस्त्यावर आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कामथे येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाट असून या घाटाच्या धोकादायक वळणामुळे अनेक अपघात होत असतात. आज झालेला हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अतिवेगामुळे वळणावर अपघात
या घाटातील धोकादायक वळणावर अनेक वाहनधारक वाहनाचा वेग कमी न ठेवता अनेकदा अतिवेगामुळेही या ठिकाणी अपघात झाले आहे. आज झालेल्या कार अपघातातील मृत व्यक्ती शंकर भिसे असून ते शासकीय अधिकारी असल्याचे समजले आहे.
कोकणात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग
कोकणातून कराडला येण्यासाठी आणि कराडमधून कोकणात जाण्यासाठी हा महत्वाच्या मार्गाचा वापर केला जातो. कुंभार्ली घाट हा धोकादायक असला तरी कोकणात जाण्यायेण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात येथून वाहतूक होत असते. त्यामुळे या घाटात अनेकदा अपघात झाले आहेत. हा अपघातही धोक्याच्या वळणावर झाला असून कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे.
स्थानीक नागरिकांची मदत
कुंभर्ली घाटात अपघात होताच या परिसरातील नागरिकांना अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. दोनशे फूट खोल दरीत कोसळली असल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती स्थानिकांनी अलोरे पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली.
मृत चालक शासकीय नोकरदार
यावेळी नागरिक मदत करण्यासाठी दरीत उतरल्यानंतर कारचालकाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कारचालकाशेजारी बसलेली महिला गंभीर जखमी झाल्याने त्या महिलेला चादरीच्या आधाराने वर आणून रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.