‘पूजा चव्हाणला देखील न्याय मिळाला पाहिजे’, करुणा शर्मांची मागणी, केली मोठी घोषणा
दरम्यान दिशा सालियन प्रकरणात करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. पूजा चव्हाणला देखील न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय -कोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनच्या वडिलांकडून हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. पूजा चव्हाणला देखील न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?
‘ज्या प्रकारे दिशा सालियनसाठी न्यायाची मागणी होत आहे. तसचं पूजा चव्हाणला देखील न्याय मिळायला पाहिजे. ती एक बंजारा समाजातील, एक गरीब घरातील मुलगी होती. तिच्या हत्येचे पूर्ण पुरवे होते. तिचे कोणत्या मंत्र्यासोबत संबंध होते, काय काय होतं हे त्यावेळी सगळ्यांच्या समोर आलं होतं. आजही मीडियाकडे या गोष्टी आहेत. मात्र तरीही तिला न्याय मिळाला नाही. पण आज पाच वर्षांनंतर दिशा सालियनसाठी न्यायाची मागणी होत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण पुजा चव्हाणला पण न्याय द्या. मला असं माहीत पडलं होतं, चित्रा वाघ ताईंनी पण खटला टाकलेला आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी माघार घेण्यासाठी अर्ज दिला होता. पण जर त्यांनी माघार घेतली तर मी पण आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी लवकरात लवकर हाय कोर्टामध्ये या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, आणि पूर्ण पुराव्यासहित मी लवकरात लवकर पत्रकार परिषद घेणार आहे, पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, असं करुण शर्मा यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियान प्रकरणावरून वातावरण तापलं
दिशा सालियानच्या वडिलांनी पाच वर्षानंतर हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यावरू आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाच वर्षांपासून हे सर्व सुरू आहे, आता कोर्टातच उत्तर देऊ असं यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.