चित्रकूट बंगल्यात माझ्या मुलांना डांबलंय, धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीत करुणा शर्मांनी नेमकं काय म्हटलंय?

करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

चित्रकूट बंगल्यात माझ्या मुलांना डांबलंय, धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीत करुणा शर्मांनी नेमकं काय म्हटलंय?
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 7:39 PM

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात त्यांच्या सहमतीने संबंधात असलेल्या जोडीदार करुणा शर्मा यांनी गंभीर तक्रार (Karuna Sharma) दाखल केली आहे. करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनीही बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र मोठ्या गदारोळानंतर त्यांनी आपली तक्रार मागे घेतली होती. (Karuna Sharma file complaint against Dhananjay Munde)

रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर, धनंजय मुंडे यांचं ठिकठिकाणी विजयीवीराप्रमाणे स्वागत होत आहे. मात्र यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडेंनी ज्यांच्याबद्दल फेसबुक पोस्ट लिहून सहमतीच्या संबंधांची कबुली दिली होती, त्याच करुणा शर्मा यांनी आता त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

करुणा शर्मा यांचे आरोप काय?

करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, करुणा शर्मा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. मात्र त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. करुणा धनंजय मुंडे या नावाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं, “आज माझा वाढदिवस आहे. पतीने 3 महिन्यांपासून माझ्या मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं आहे. त्यांना मला भेटूही देत नाहीतच, पण बोलूही दिलं जात नाही. राजकीय सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे”

करुणा यांचं हे अकाऊंट खरं आहे की नाही, हे समजू शकलेलं नाही.

Karuna Sharma FB Post

करुणा शर्मा यांची फेसबुक पोस्ट

संबंधित बातम्या 

अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण? 

(Karuna Sharma file complaint against Dhananjay Munde)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.