जास्तीत जास्त 9 महिने, नंतर त्यांना… धनंजय मुंडेंबद्दल करूणा शर्मांचा नवा दावा काय ?
धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं.

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. करूणा शर्मा प्रकरणातील कोर्टाच्या आदेशांना धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. करूणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने दिले होते. याचप्रकरणी धनंजय मुंडे यांनी आव्हानात्मक याचिका दाखल केली आहे. त्याचसंदर्भात याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. यावेळी करूणा शर्मा यांनी या मुद्यावर पुन्हा एकदा आपली बाजू स्पष्ट करत मेंटेनन्सचती मागणी केली. तसेच आणखी ,सहा महिन्यात जास्तीत जास्त नऊ-दहा महिन्यांत मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होणार असं भाकीतच करूणा शर्मा यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या विविध विषयांवर बोलल्या.
मी वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली होती, आणि त्यामध्ये हीच मागणी केली होती की मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे. मला मेंटेनन्स पाहिजे. घरगुती हिंसाचार झाला, त्यावर याचिका दाखल केली होती. खालच्या कोर्टात आम्हाला न्याय मिळाला, पहिली बायको म्हणून मी जास्त नाही 15 लाखांची मागणी केली होती. पण त्यांनी 2 लाखांचा मेंटेनन्स दिला आहे, मात्र धनंजय मुंडे यांना आम्हाला 2 लाखही द्यायचे नाहीत, त्यासाठी त्या ऑर्डरच्या विरोधात धनंजय मुंडे सेशन कोर्टामध्ये गेले आहेत,असे करूणा शर्मा म्हणाल्या.
आमदारकी रद्द होणार का ?
आमदारकी रद्द होण्याची जी केस आहे ती छत्रपती संभाजीनगर कोर्टात सुरू आहे. लवकरात लवकर त्याच्यावरही सुनावणी होणार आहे.त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जे खोटं ॲफेडेव्हिट दिलं आहे, त्यासाठी परळीमध्ये मी केस दाखल केली आहे की त्यांनी खोटी माहिती दिली आहे. त्या केस मध्ये चार तारखेला परत सुनावणी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जास्तीत जास्त सहा महिने नाहीतर नऊ दहा महिने नंतर त्यांचा ( धनंजय मुंडे) आमदारकीचा राजीनामा होईल असं भाकीतही करूणा यांनी वर्तवलं.
दिशा सालियाना केसवर काय म्हणाल्या करूणा शर्मा ?
दिशा सालियान मृत्यूचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियानला न्याय मिळाले पाहिजे हे माझी पण इच्छा आहे. न्याय मागितला आहे, त्यासाठी मी अभिनंदन करते, पण त्याच्यासोबत सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची पण चौकशी व्हायला पाहिजे. एक सुपरस्टार अशी फाशी घेऊन आयुष्य कसं संपवू शकतो, असा सवाल उपस्थित करत सुशांतच्या मृत्यूची देखील चौकशी व्हायला पाहिजे, असं करूणा शर्मा म्हणाल्या. तसेच पूजा चव्हाण प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. एका मुलीवर कोणीही राजकारण करू नये, असे त्या म्हणाल्या.