BJP with NCP : विधानसभा जिंकण्यासाठी भाजप घालणार राष्ट्रवादीला साकडे?

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेसाठी अंधेरी पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मात्र, यात राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची आहे कारण...

BJP with NCP : विधानसभा जिंकण्यासाठी भाजप घालणार राष्ट्रवादीला साकडे?
देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS), अजित पवार ( AJIT PAWAR )Image Credit source: TV9 MARATHI
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 4:10 PM

मुंबई : अंधेरीचे शिवसेना आमदार रमेश लटके (RAMESH LATKE) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (RUTUJA LATKE) यांनी निवडणूक लढविली. याचवेळी राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. भाजपने या निवडणूकीसाठी मुरजी पटेल (MURJI PATEL) यांची उमेदवारी जाहिर केली. मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुरजी पटेल यांचा जोरदार प्रचार सुरु केला. मात्र, ऐनवेळी मुरली पटेल यांना या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सर्वसाधारणतः एखाद्या विधानसभा सदस्याच्या निधनामुळे त्या मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यास तेथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत अन्य पक्ष उमेदवारी देत नाही असे संकेत आहेत. पण, हे संकेत भाजपने देगलूर, पंढरपूर आणि कोल्हापूर उत्तर या पोटनिवडणुकीत बाजूला ठेवले होते.

काय आहे इतिहास?

देगलूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि पंढरपूर कवठेमहाकांळचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. भाजपने आपले उमेदवार देत या निवडणुकीत चुरस निर्माण केली.

रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांच्याविरोधात भाजपने २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार असलेले सुभाष साबणे यांना तिकीट दिले. पण, १ लाख आठ हजार मते घेऊन जितेश अंतापूरकर विजयी झाले. तर, पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर, भाजपने सत्यजित कदम यांना या निवडणूकीत उतरवले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. हिंदुत्व आणि स्वाभिमान या मुद्द्यांवरून गाजलेल्या या निवडणूकीत अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला.

पुनरावृत्ती होणार का?

भाजपने पंढरपूर जिंकले. पण, देगलूर आणि कोल्हापूर उत्तरमध्ये गमावले. आता त्याची पुनरावृत्ती कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत होऊ नये याची खबरदारी भाजपकडून घेण्यात येत आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात कसबा पेठमधुन माजी महापौर मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघांतून लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. या दोन आमदारांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. येथे होणाऱ्या पोटनिवडणूकीत राजकीय हार होणे भाजपला परवडणारे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवणार नाही, असे आधीच जाहीर केले आहे. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे.

त्यामुळे या दोन्ही जागांवर निवडणूक न होता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जाणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्याच धर्तीवर कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुक बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून राष्ट्रवादीला साकडं घालण्यात येणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.