केडीएमसी घंटागाडी 5 कर्मचाऱ्यांना मारहाण, काम बंद आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग
घंटागाडीवर काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी कचरा टाकण्यावरुन मारहाण केली आहे.
कल्याण : कल्याणमध्ये कचरा टाकण्यावरुन घंटागाडीवरील पाच कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली (KDMC Garbage Van Workers Issue). या मारहाणी विरोधात कामगारांनी काम बंद आंदोलन (Work Stop Protest) पुकारले आहे. या प्रकरणात केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. सदर ठिकाणी कचरा टाकण्यास कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. मात्र, मारहाण झाली त्याबद्दल तक्रार नोंदविण्याची सूचना कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे (KDMC Garbage Van Workers Issue).
कल्याण पश्चिम येथील बारावे गावात प्रोसेस प्लांट आहे. या ठिकाणी केडीएमसीचे घंटा गाडीवरील सफाई कामगार कचरा टाकतात. काल रात्री आठ वाजताच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेल्या पाच कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणी विरोधात कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलन पुकारले आहे.
महापालिकेतील दोन प्रभाग क्षेत्रतील कर्मचाऱ्यांनी या काम बंद आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा जमा झाला. अखिल भारतीय कर्मचारी कामगार संघाचे पदाधिकारी निलेश चव्हाण या प्रकरणात केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. यावेळी ज्या नागरिकांनी माराहाण केली होती. तेही काही लोक पवार यांच्या भेटीसाठी आले.
स्थानिकांच्या मते ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. ती जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी कचरा टाकू देणार नाही. कर्मचाऱ्यांना मारहाणीसाठी स्थानिकांनी माफी मागण्यास नकार दिला. “आमच्याकडून सदर ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांना मारहाण झाली आहे. त्यांनी पुढाकार घेऊन त्याची तक्रार नोंदविली पाहिजे”, अशा सूचना केडीएसी अतिरिक्त आयुक्त पवार यांनी संबंधितांना केल्या आहेत.
घरासमोर फटाके फोडण्यास मनाई करताच मद्यधूंद तरुणांची वृद्धेसह कुटुंबाला मारहाण; कल्याणमध्ये खळबळhttps://t.co/uMxHRhjypw#KalyanCrime #CrimeNews #KalyanPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
KDMC Garbage Van Workers Issue
संबंधित बातम्या :
दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार