Ketaki Chitale : केतकी चितळेची 8 तास कसून चौकशी, चौकशीत काय बाहेर? आज कोठडी संपणार, बेल की जेलच?
केतकी चितळे हिची 8 तास कसून चौकशी करण्यात आलेली आहे. जप्तीमधील लॅपटॉप आणि मोबाईल मधील तांत्रिकदृष्टया बाबींबाबत ठाणे सायबर सेल (thane cyber cell) कडून तांत्रिक बाबी रिपोट येणे बाकी आहे.
ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) पोलीस कोठडी आज संपते आहे. तिला आज पोलीस ठाणे कोर्टात हजर करणार आहे. त्याआधी आज ठाणे गुन्हे शाखेकडून (Thane Crime Branch) केतकी चितळे हिची 8 तास कसून चौकशी करण्यात आलेली आहे. जप्तीमधील लॅपटॉप आणि मोबाईल मधील तांत्रिकदृष्टया बाबींबाबत ठाणे सायबर सेल (thane cyber cell) कडून तांत्रिक बाबी रिपोट येणे बाकी आहे. त्यामुळे तिला आज तरी दिलासा मिळणार की केतकीचा कोठडी मुक्काम आणखी वाढणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक झाली आहे. या पोस्टनंतर राष्ट्रवादी आक्रमक मोडवर आली होती. तसेच इतरही राजकीय पक्षांकडून केतकी चितळेवर जोरदार टीका होत होती. केतकी चितळेवर आता राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
काय काय ताब्यात घेतलं?
पोलिसांनी केतकीच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. यात तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. अशी माहिती समोर आली आहेत तसेच त्यात तिचे तीन मोबाईलही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणात आता सायबर सेलचीही मदत घेण्यात येणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. केतकीच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या तपासात आणखी काय बाहेर येणार, याची उत्सुकता असेल. यात आणकी काही वादग्रस्त सापडतंय का, आणि या पोस्टशी संबंध जोडणाऱ्या गोष्टी शोधण्यावर पोलिसांचा भर असणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
Maharashtra |Thane Crime Branch team reaches residence of Marathi actress Ketaki Chitale in Kalamboli, Navi Mumbai. Her laptop, computer hard disk & other electronic evidence seized
She was arrested y’day for allegedly sharing derogatory post on FB against NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/Rbo7iAfVnm
— ANI (@ANI) May 16, 2022
केतकीची पोस्ट काय होती?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll